कृषि जैवतंत्रज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मिती शक्य - डॉ.उदय खोडके
तीन दिवसीय कृषि जैवतंत्रज्ञान प्रशिक्षण उद्घाटन
===================================
लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ.इंद्र मणि यांचे संकल्पनेतून व मुख्यमंत्री सहाय्यीत प्रकल्पांतर्गत “कृषि जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शिक्षण व संशोधन प्रशिक्षण” या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ.उदय खोडके, प्रमुख अतिथि संचालक संशोधन डॉ.खिजर बेग, अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे आयोजक म्हणून तर डॉ.भास्कर आगलावे, डॉ.अच्युत भरोसे, डॉ.सारिका भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समालोचनात डॉ.उदय खोडके म्हणाले की,कृषि स्नातकांनी त्यांच्या कौशल्यात प्रशिक्षणाद्वारे वृद्धी करून शेतकरी व पशुपालकांचे हित जोपासावे. तसेच विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथील विकसित जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करून उच्च प्रतीचे संशोधन करावे असे प्रशिक्षणार्थींना आवाहन केले. आयोजक डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, बदलत्या वातावरणास अनुरूप अन्नधान्य कमतरतेवर कृषि जैवतंत्रज्ञानाची मदत होऊ शकते. कृषि जैवतंत्रज्ञानाचा उपयोग उच्च तापमान, पुर व अवर्षणात तग धरून राहणारे पिकांचे वाण विकसित होण्यास मदत होते. या प्रशिक्षणासाठी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी मधील विविध अभ्यासक्रमातील एकूण ४० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदरील प्रशिक्षणामध्ये वनस्पती जैवतंत्रज्ञान व जैव महितीशास्त्र या बाबतचे अद्यावत तंत्रज्ञान बौद्धिक व प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येणार आहे. यात दक्षिण कोरिया स्थित शास्त्रज्ञ डॉ.उल्हास कदम, डॉ.राहुल शेळके व बायर कंपनी मधील विभागप्रमुख डॉ.संदीप दांगट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक डॉ.राहुल चव्हाण यांनी, सूत्रसंचालन ऋषिकेश मातळे तर आभार डॉ.विद्या हिंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.योगेश भगत, डॉ.रमेश ढवळे, डॉ.दीप्ती वानखेडे, अभिजीत देशमुख, प्रतीक्षा जाधव, उवैस शेख, किशोर घोळवे, विरभद्र दुरूगकर, सुरेश बिराजदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
=====================================
Comments
Post a Comment