डॉ.अंजलीताई घाडगे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन
शारदीय नवरात्र उत्सवाची सुरूवात
=================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
महाराष्ट्राचे शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ.अंजलीताई घाडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ.अंजलीताई घाडगे यांनी सांगितले की, कोकणवासीयांची कुलदेवता अशी माता योगेश्वरी देवीची ओळख असल्याने राज्यभरातील भाविक तर दर्शनासाठी येत असतात याचबरोबर परराज्यातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात अंबाजोगाई या ठिकाणी दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची आयोजन करण्यात येते. भाविकांसाठी भजन संध्या, भक्ती गीते, प्रवचन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. आपण नवरात्र उत्सवानिमित्त माता योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले अशी माहिती डॉ.घाडगे यांनी दिली.
=================================
Comments
Post a Comment