अंजलीताई घाडगे यांच्याकडे केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप तयार आहे
=================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
अंजलीताई घाडगे यांनी आपला राजकीय प्रवास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून २०१४ साली सुरू केला. मागील १२ वर्षांपासून अंजलीताई या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना प्रश्नांची सोडवणूक करण्याची चांगली जाण आहे. ज्यांच्याकडे केज मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप तयार आहे अशा नेत्या म्हणजे अंजलीताई घाडगे अशी प्रतिमा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
राजकारणात प्रवेश केलेल्या अंजलीताई घाडगे यांनी आपला राजकीय प्रवास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू केला आणि केज विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला. यश मिळाले नाही. तरी परंतु, त्यांनी हार न मानता पुन्हा नव्या उमेदीने केज मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करून आपला जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. २०१९ मध्ये त्यांनी पक्षाचा आदेश पाळत निवडणूक लढवली नाही. मात्र संपर्कात तेच सातत्य त्यांनी आजतागायत टिकवून ठेवले आहे. अंजलीताई घाडगे यांनी कोविड या संकट काळात सर्वसामांन्यांना मदत केली, शेकडो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा केला. या कार्यातून त्यांनी माणुसकी व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे उल्लेखनीय कार्य केले. याकामी अंजलीताई यांना खऱ्या अर्थाने मदत झाली ती त्यांच्या दोन्ही उच्चपदस्थ बहिणींची आणि कुटुंबाची. संकट काळात केज विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आपण कायम सोबत असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. खरे तर अंजलीताई या मागील दोन वर्षांपासून राजकारणात वेट अँड वॉचच्या भूमिकेत होत्या, एका मुरब्बी व अभ्यासू नेत्याप्रमाणे अंजलीताई घाडगे यांनी केज मतदारसंघाच्या राजकीय पटलावर आपले राजकीय पत्ते उघड केले. आणि महिनाभरापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण मतदारसंघात स्वागत होत आहे. जोरदार कमबॅकमुळे केज मतदारसंघाचे राजकारण आता नव्याने ढवळून निघाले आहे. हे प्रत्येकाला मान्यच करावे लागणार आहे. अंजलीताई या दिवंगत मुख्याध्यापक रामराव घाडगे यांच्या कन्या आहेत. संपूर्ण घाडगे परिवार हा उच्च विद्याविभूषित आहे. वंचित घटकांची सेवा करा हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अंजलीताई या सतत प्रयत्न करीत आहेत. मोठा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. आज केज मतदारसंघात वंचित घटकांचे प्रभावी नेतृत्व म्हणून अंजलीताई घाडगे यांच्याकडे जनता मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंजलीताई घाडगे यांनी सांगितले की, मागील बारा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आपण स्वतः केज मतदारसंघाच्या राजकारणात सक्रिय आहोत. त्यावेळी विकासाचे जे प्रश्न मागील सर्व निवडणुकीच्या वेळी चर्चेत असायचे तेच प्रश्न घेऊन विद्यमान आमदार जर आज पुन्हा जनतेसमोर जात असतील तर विकास झाला हे म्हणण्यात काहीच तथ्य राहत नाही..? मग विकास नेमका कुणाचा झाला. हा शोधाचा विषय आहे. याचे उत्तर विद्यमान आमदारांनी कधी तरी द्यायला पाहिजे असा परखड सवाल ही डॉ.अंजलीताई घाडगे या आपल्या भाषणातून विचारत आहेत. तसेच त्या जनतेशी संवाद साधताना म्हणतात कि, जनतेला लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही आता बदल पाहायचा आहे. त्यामुळे लोक माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचे त्यांच्यात व माझ्यात होणाऱ्या सातत्यपूर्ण संवादातून दिसून येत आहे. आज ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पावसाळ्यात अनेक गावात चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. हाच विकास म्हणायचा का..? शेतकऱ्यांना मुबलक विज मिळत नाही. यासह प्रश्नांवर कायमच प्रश्नचिन्ह राहिले आहे. विद्यमान आमदार व त्यांचे कुटुंबीय हे वर्षानुवर्षे सत्तेत असताना ही नवउद्योजकांसाठी तुम्ही मतदारसंघातील अंबाजोगाई व केज सारख्या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभा का करू शकला नाहीत..? देशात व राज्यात तुमचेच सरकार म्हणजे डबल इंजिन सरकार असून ही तुम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न का सोडवू शकला नाहीत. एकप्रकारे जनतेच्या हिताचे प्रश्न तुम्ही वर्षानुवर्षे प्रलंबित ठेऊन त्यांना वेठिसच धरत आहात असेच यातून सिद्ध होते आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी व केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवार म्हणून दावेदारी आहे. मतदारसंघात मूलभूत बाबीत राजकारण करणे हे दुर्दैवी आहे. पण, सत्ताधारी ते करीत आहेत. समाजातील वंचित घटकांची मुले शिकून मोठी झाली पाहिजेत यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च करणारे कै.रामराव घाडगे गुरूजी हे केज मतदारसंघाला सुपरिचित नांव आहे, राजकारणात जाऊन आपल्या मुलीने वंचित घटकांना न्याय द्यावा हि त्यांची कायमच ईच्छा व अपेक्षा राहिली होती. वडिलांनी पाहीलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी अंजलीताई घाडगे या मागील १२ वर्षांपासून राजकारणात सक्रियपणे कार्यरत आहेत. केज मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात नव्यानेच दाखल झालेल्या अंजलीताई घाडगे यांचे नांव संभाव्य उमेदवारांच्या यादीत क्रमांक एकवर असल्याचे शुभसंकेत आता दिवसेंदिवस पहायला मिळत आहेत, त्यांनी मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागासह शहरी भागात सर्वसामांन्यांशी असलेली नाळ, संपर्क आजघडीला केज मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय ठरू लागला आहे. केज मतदारसंघात नवउद्योजकांसाठी अंबाजोगाई व केज सारख्या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभ्या करणे, मतदारसंघातील जनतेच्या हिताचे प्रलंबित प्रश्न यांची सोडवणूक करणे, ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते तयार करणे, सर्वधर्मिय, सर्वजातीय समाज बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी आपल्याला केज विधानसभा मतदारसंघात संधी मिळावी, आपल्याकडे केज मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप तयार आहे. आमचे नेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मुलमंत्र मी यापुढे ही जपणार आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल व त्यांचे जिवनमान कसे उंचावेल यासाठीच माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल अशी ग्वाही अंजलीताई घाडगे यांनी विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमधून, संवाद साधताना दिली आहे. दिवसेंदिवस अंजलीताई यांना संपूर्ण केज मतदारसंघात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. त्यांनी मागील काही महिन्यांपासून ग्रामीणसह शहरी भागातील लोकांशी कायम संपर्क कायम ठेवून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून संपूर्ण केज मतदारसंघ पिंजून काढला आहे हे विशेष होय. त्यामुळे केज मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप तयार आहे अशा नेत्या म्हणजे अंजलीताई घाडगे अशी प्रतिमा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
================================
Comments
Post a Comment