मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केली विचारपूस

मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केली विचारपूस

================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

मराठा आरक्षणासाठी व्यापक लढा उभा करणारे संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृती विषयी आस्थेने चौकशी केली. या भेटीत डॉ.अंजलीताई यांनी जरांगे पाटील यांना दादा तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, योग्य औषधोपचार घ्यावेत अशी विनंती केली. याप्रसंगी डॉ.अंजलीताई यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी उपस्थित होते.

==================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)