Posts

Showing posts from April, 2024

सलग ४ वेळेस राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धा जिंकणारी संपूर्ण देशातील एकमेव अकॅडमी

Image
  ॥ सुंदर हस्ताक्षर हाच सुंदर व्यक्तिमत्त्वाचा खरा दागिना ॥ पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस (या उन्हाळी सुट्ट्यांचा योग्य वापर करून संपूर्ण आयुष्यभरासाठी आपल्या पाल्याचे इंग्लिश व मराठीचे हस्ताक्षर सुंदर करा व त्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवा फक्त पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेसमध्ये.) •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• लहानपणी मुलांवर अनेक संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे अक्षर संस्कार. चित्र, गायन, नृत्य इत्यादी कलेप्रमाणे हस्ताक्षर चांगले काढता येणे ही सुद्धा एक कलाच आहे. मानवाचे अंतर्मन दाखवणारा हा आरसा आहे. आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या मनावर प्रभाव पाडणारे हे एक तंत्र आहे. सुंदर हस्ताक्षर आपल्या जवळ टिकणारे एक भूषण आहे. दुसऱ्याच्या मनात प्रेम व आदरभाव निर्माण करणारी ही साधना आहे. सुंदर, वळणदार, पाहता क्षणी प्रसन्न वाटावे यासारखे दुसरे अक्षरसुख नाही. पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस गेल्या ९ वर्षांपासून अंबाजोगाई शहरात निरंतरपणे चालू असून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले आहे.  ● पार्थ अकॅडमी विद्यार्थ्यांच्या हस...

बीड लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांना मिळतेय मतदारांची पसंती

Image
बीड लोकसभा मतदारसंघात वाजणार महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांची शिट्टी ज्येष्ठ व अभ्यासू नेते ऍड.आण्णाराव पाटील यांची रणनिती सरस ठरणार  =================================== बीड (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मराठवाड्यात बीडची लोकसभा नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते ऍड.आण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत हजारे हे निवडणूक लढविणार आहेत. गुरूवारी हजारे यांनी उमेदवारी अर्ज बीड येथून प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांना मतदारांची पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण, बीडची जनता घराणेशाहीला कंटाळली असून नव्या पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यामुळे हजारे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ व अभ्यासू नेते ऍड.आण्णाराव पाटील हे सत्ताधाऱ्यांना जोरदार हबाडा देणार हे दिसून येत आहे. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीची शिट्टी वाजणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एवढे मात्र निश्चित. राज्यात नेहमीच चुरशीची ठरणाऱ...

॥ सुंदर हस्ताक्षर हाच सुंदर व्यक्तिमत्त्वाचा खरा दागिना ॥

Image
॥ सुंदर हस्ताक्षर हाच सुंदर व्यक्तिमत्त्वाचा खरा दागिना ॥ पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस (या उन्हाळी सुट्ट्यांचा योग्य वापर करून संपूर्ण आयुष्यभरासाठी आपल्या पाल्याचे इंग्लिश व मराठीचे हस्ताक्षर सुंदर करा व त्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवा फक्त पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेसमध्ये.) •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• लहानपणी मुलांवर अनेक संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे अक्षर संस्कार. चित्र, गायन, नृत्य इत्यादी कलेप्रमाणे हस्ताक्षर चांगले काढता येणे ही सुद्धा एक कलाच आहे. मानवाचे अंतर्मन दाखवणारा हा आरसा आहे. आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या मनावर प्रभाव पाडणारे हे एक तंत्र आहे. सुंदर हस्ताक्षर आपल्या जवळ टिकणारे एक भूषण आहे. दुसऱ्याच्या मनात प्रेम व आदरभाव निर्माण करणारी ही साधना आहे. सुंदर, वळणदार, पाहता क्षणी प्रसन्न वाटावे यासारखे दुसरे अक्षरसुख नाही. पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस गेल्या ९ वर्षांपासून अंबाजोगाई शहरात निरंतरपणे चालू असून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले आहे.  ● पार्थ अकॅडमी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्ष...

वीज जोडणी मिळेना ; आजी माजी सैनिकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

Image
वीज जोडणी मिळेना ; आजी माजी सैनिकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा जय जवान आजी माजी सैनिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य ================================ अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा व सर्व बाबींची पूर्तता करून ही येथील गट नंबर 591(फौजी निगराणी तामीरात) या जमिनीमधील सैनिकांच्या 572 परिवारांना वीज पुरवठा व घरगुती मीटर जोडणी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत महावितरणने दफ्तर दिरंगाई टाळून तात्काळ विद्युत पुरवठा व घरगुती मीटर जोडणी मिळावी अशी मागणी जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग शेप यांनी अंबाजोगाई येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे सोमवार, दिनांक 29 एप्रिल रोजी दिलेल्या रिमांयडर निवेदनाद्वारे केली आहे. जय जवान आजी माजी सैनिक संस्थेच्या वतीने विद्युत पुरवठा व घरगुती मीटर मिळण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई येथील गट नंबर-591(फौजी निगराणी तामीरात) या जमिनी मध्ये सन-2011 पासून आजी माजी सैनिकांच्या 572 परिवार हे कायमस्वरूपी घरे बांधून राहत आहेत. 164 परिवारांची अंबाजोगा...

बर्दापूर सर्कलसह अंबाजोगाईत महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांचे बळ वाढले

Image
बर्दापूर सर्कलसह अंबाजोगाईत महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांचे बळ वाढले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) अनेकांचा जाहीर प्रवेश ================================ अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार), मित्र पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांचे बर्दापूर जि.प.सर्कल तसेच अंबाजोगाई शहरात बळ वाढले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात - शरदचंद्र पवार शनिवार, दिनांक २७ एप्रिल रोजी अनेकांनी जाहीर प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे बीड जिल्हा पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे यांनी सहर्ष स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) च्या वतीने जाहीर पक्ष प्रवेशाचे आयोजन अंबाजोगाई शहरातील डॉ.नरेंद्र काळे यांचे संपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्यातील बर्दापूर सर्कल मधील माजी सरपंच, माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी बीड जिल्हा पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव ...

देशहितासाठी सक्षम मोदी सरकारला निवडून द्या - आ.नमिताताई मुंदडा

Image
देशहितासाठी सक्षम मोदी सरकारला निवडून द्या - आ.नमिताताई मुंदडा पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडांनी अंबाजोगाई शहर पिंजून काढले ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) बीड जिल्ह्यातील लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना लाखोंची लीड देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवा आणि व्यापक देशहितासाठी सक्षम मोदी सरकारला पुन्हा एकदा निवडून आणण्यात योगदान द्या असे आवाहन केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातील नागरिकांना केले.  महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आ.नमिताताई मुंदडा अंबाजोगाई शहरात दररोज डोअर टू डोअर प्रचार करत आहेत. आतापर्यंत आ.मुंदडांनी अर्धे शहर पिंजून काढले आहे. आबालवृद्ध सर्व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत. स्थिर आणि खंबीर मोदी सरकारच्या काळात देश वेगाने प्रगती करत असून महासत्ता होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. ट्रिपल तलाक रद्द करण्यासारखा मोठा सामाजिक निर्णय घेतला असून ...

स्वराज्य हे सुराज्य झाले, ही शिवराज्याभिषेकाची उपयुक्तता - शिवचरित्र अभ्यासक रविंद्र पाटील

Image
स्वराज्य हे सुराज्य झाले, ही शिवराज्याभिषेकाची उपयुक्तता - शिवचरित्र अभ्यासक रविंद्र पाटील खोलेश्वर महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) शिवराज्याभिषेक हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी साध्य नव्हते. तर ते साधन होते, स्वराज्याला एक अधिकृत अधिष्ठान देण्यासाठी शिवराज्याभिषेक हा एक महत्त्वाचा पुरावा होता. स्वराज्य हे सुराज्य झाले पाहिजे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मनस्वी इच्छा होती, हीच शिवराज्याभिषेकाची उपयुक्तता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक तथा प्रख्यात वक्ते रवींद्र पाटील (पाचोरा,जळगाव) यांनी केले. ते खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाईच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा अंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा वर्षाच्या निमित्ताने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून बोलत होते. या चर्चासत्रातील उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदी खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर हे उपस्थित होते. तर मंचावर भा.शि.प्र.संस्थेच्या केंद्रीय...

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पंकजाताईंना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवा : आ.नमिताताई मुंदडा

Image
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पंकजाताईंना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवा : आ.नमिताताई मुंदडा पंकजाताईंच्या विजयात योगदान देण्यासाठी आ.नमिता मुंदडांचा डोअर-टू-डोअर प्रचार ================================ अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) लोकसभेच्या बीड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा सरसावल्या असून डोअर टू डोअर प्रचार करत त्या अंबाजोगाई शहर पिंजून काढत आहेत. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पंकजाताईंना लोकसभेवर विक्रमी मताधिक्याने पाठविण्याचे आवाहन आ.मुंदडा यांनी जनतेला केले आहे.  लोकसभेच्या बीड मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची तरी जसजशी जवळ येत आहे तसे पंकजाताई यांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. केज मतदार संघात पंकजाताई मुंडे यांच्या विजयसाठी मुंदडा कुटुंब अहोरात्र परिश्रम घेत आहे. आ.नमिता मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा या तिघांनीही पूर्णपणे झोकून देऊन प्रचार सुरू केला आहे. दुपारपर्यंत मतदार संघातील ग...

बीड लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांना मिळेल मतदारांची पसंती

Image
बीड लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांना मिळेल मतदारांची पसंती ज्येष्ठ व अभ्यासू नेते ऍड.आण्णाराव पाटील देणार सत्ताधाऱ्यांना हबाडा ==================================== बीड (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मराठवाड्यात बीडची लोकसभा नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते ऍड.आण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत हजारे हे निवडणूक लढविणार आहेत. गुरूवारी हजारे यांनी उमेदवारी अर्ज बीड येथून प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांना मतदारांची पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण, बीडची जनता घराणेशाहीला कंटाळली असून नव्या पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यामुळे हजारे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ व अभ्यासू नेते ऍड.आण्णाराव पाटील हे सत्ताधाऱ्यांना हबाडा देणार हे दिसून येत आहे. राज्यात नेहमीच चुरशीची ठरणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात यावेळेला मतदार नव्या चेहऱ्याला संधी देऊन इतिहास घडवू शकतात अशी चर्चा बीड मतदारसंघात व राजकीय वर्...

आशिष बालासाहेब लोमटेचे नेत्रदीपक यश ; एमबीबीएस होण्याचा मिळवला बहुमान

Image
आशिष बालासाहेब लोमटेचे नेत्रदीपक यश ; एमबीबीएस होण्याचा मिळवला बहुमान सर्वस्तरांतून आशिष लोमटेवर अभिनंदनाचा वर्षाव  =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) इच्छाशक्ती व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याची प्रचिती म्हणजे येथील गुणवंत विद्यार्थी डॉ.आशिष अनिता बालासाहेब लोमटे हा होय. एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करून त्याने कुटुंबाचे नांव उंचावले आहे.  एमबीबीएस - २०१८ च्या बॅचचा दिक्षांत समारंभ नुकताच अंबाजोगाई येथे आर्यवीर लॉन्स, केज रोड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने (मुंबई) आणि डॉ.अश्विनीकुमार तुपकिरे (संचालक, हेडगेवार हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर.) हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालय व महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे हे होते. यावेळी उपअधिष्ठाता डॉ.अरविंद बगाटे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या दिक्षांत समारंभात डॉ.अश्विनीकुमार तुपकिरे यांच्या हस्ते आ...

समताधिष्ठित समाजनिर्मिती‌ मध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान - हेमंत धानोरकर

Image
समताधिष्ठित समाजनिर्मिती‌ मध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान - हेमंत धानोरकर अंबाजोगाईत विविध उपक्रम राबवून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय, संत सावता माळीनगर येथे अभिवादन रॅली, प्रबोधनपर व्याख्यान, रक्तदान शिबीर आदींसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव समितीकडून माळी समाजाचा गुगल फॉर्मद्वारे जनगणनेस प्रारंभ करण्यात आला. क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने गुरूवार, दि ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले वसतिगृहामध्ये असलेल्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले चौकाच्या नामफलकास अभिवादन करण्यात आले. त्या नंतर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, परळी रोड पासून संघर्षभूमी चनई या ठिकाणापर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ...

राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित वृत्तीने कार्य केले पाहिजे - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

Image
राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित वृत्तीने कार्य केले पाहिजे - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव ; भव्य मिरवणूकीचे आयोजन ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त या दोन्ही राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक अंबाजोगाई येथे काढण्यात आली. या संयुक्त जयंती महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते अशी माहिती जयंती समितीचे अध्यक्ष नितीन सरवदे, सचिव धम्मपाल मोरे यांनी दिली. यावेळी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक पद्धतीने विविध कला गुणांचे सादरीकरण करीत ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरूवात संयुक्त जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष तथा इंडीयन मेडिकल असोसिएशनचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले व समन्वयक विकास अधिकारी ईश्वरअण्णा जोगदंड यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण...

प्रसारमाध्यमांनी संविधान निष्ठा जपायला हवी - पत्रकार प्रशांत लाटकर

Image
प्रसारमाध्यमांनी संविधान निष्ठा जपायला हवी - पत्रकार प्रशांत लाटकर ============================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) व्यक्ती स्वातंत्र्यातच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही समाविष्ट आहे. जे अधिकार व्यक्तीला आहे तेच प्रसारमाध्यमांनाही आहेत. व्यक्तीनिष्ठ, भेदभाव पूरक व असत्य कथन करणारी पत्रकारीता ही निकृष्ट दर्जाची समजली जाते. तर सत्यशोधन करणारी, शासनाला जाब विचारणारी ध्येयनिष्ठ पत्रकारीता ही कल्याणकारी समजली जाते. पण, आज भांडवलदारी व्यवस्थेने प्रसारमाध्यमांवर काही प्रमाणात ताबा मिळवलेला आहे. त्या माध्यमातून अनेक प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. विविधता जपण्याऐवजी सर्वांना एकाच रंगात रंगविण्याचे कार्य होतांना दिसत आहे. बातम्या वस्तुनिष्ठ स्वरूपात स्विकारण्या ऐवजी त्या बऱ्याचदा मोडून-तोडून प्रसारित केल्या जात आहेत. समस्यांना व सत्याला बगल देण्याची वृत्ती वाढली आहे. त्यातून माध्यामांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. परंतु, सामाजिक माध्यमे मात्र सत्यशोधकाची भूमिका बाजावत आहेत. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या देणगीचा ते पुरेपूर उपयोग करीत आहेत. लोक...

बीड जिल्ह्यात भाजपाचे बुथ विजय अभियान पंकजाताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवणार

Image
बीड जिल्ह्यात भाजपाचे बुथ विजय अभियान पंकजाताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवणार प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करणार - भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांची माहिती =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रील पासून सहा दिवसीय ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार, या अभियानातर्गंत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढविण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघात आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्यासह मार्गदर्शनाखाली सर्व लोकप्रतिनिधी जिल्हा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते विविध उपक्रम हाती घेेणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिली. ‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या 6 दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येणार त्या अनुषंगाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर ...