राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित वृत्तीने कार्य केले पाहिजे - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव ; भव्य मिरवणूकीचे आयोजन
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त या दोन्ही राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक अंबाजोगाई येथे काढण्यात आली. या संयुक्त जयंती महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते अशी माहिती जयंती समितीचे अध्यक्ष नितीन सरवदे, सचिव धम्मपाल मोरे यांनी दिली.
यावेळी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक पद्धतीने विविध कला गुणांचे सादरीकरण करीत ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरूवात संयुक्त जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष तथा इंडीयन मेडिकल असोसिएशनचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले व समन्वयक विकास अधिकारी ईश्वरअण्णा जोगदंड यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.राजेश इंगोले यांनी महापुरूष हे सर्वांनी अभ्यासून समजून घेऊन जीवनात आपले आचरण आणि व्यवहार त्याप्रमाणे घडवून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत महापुरूषांचे विचार स्विकारून त्या मौलिक विचारांचे वारसदार होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. समाजातील काहींनी तसेच राजकीय व्यवस्थेने महापुरूषांना पद्धतशीरपणे जाती-जातीत वाटून त्याचा वापर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला. हा धोका ओळखून आता तरी समाजाने एकत्र येऊन राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित वृत्तीने कार्य केले पाहिजे असे म्हणत जयंती यांस महामानवांची प्रतीके समजून त्या साजऱ्या झाल्या पाहिजेत असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक महिला, युवती, विद्यार्थी आणि युवकांनी विविध सांस्कृतिक कलागुणांचे अप्रतिम सादारीकरण करीत उपस्थित जनसमुदायाची उत्स्फूर्त दाद मिळवली. मुलींची पारंपरिक लेझीम, काठी, नृत्याविष्काराणे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. जयंती मिरवणूक यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक डॉ.राजेश इंगोले, अध्यक्ष नितिन सरवदे, महिला पथक अध्यक्ष सुषमाताई वाघमारे, भावनाताई कांबळे, सचिव धम्मा मोरे , उपाध्यक्ष गोविंद मस्के, सहसचिव सुनिल कांबळे , अभिलाष बनसोडे, प्रशांत वेडे, कोंडिबा मोरे, ब्रिजेश इंगळे, लखन वैद्य, लक्ष्मण कसबे, समीर वेडे, अजय गोरे, शुभम मस्के, शाम सरवदे, विशाल कांबळे, प्रणित वाघमारे, राहूल सुरवसे, स्वप्निल सोनवणे, प्रकाश भालेराव, आकाश शिंदे, विशाल वेडे, शार्दुल वाघमारे, विकास वेडे, सरगम मस्के, मंगेश वैद्य, भैय्यासाहेब वेडे, अनिल कांबळे, दिपक पोटभरे, उज्ज्वल सोनवणे व इतर सदस्यांनी प्रयत्न करत हा उत्सव पार पाडला. या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण ओन्ली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यु-ट्यूब चॅनेलचे सुनिल रोडे यांनी केले. जयंती उत्सव मिरवणुकीत ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले.
=================================
Comments
Post a Comment