बीड लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांना मिळतेय मतदारांची पसंती
बीड लोकसभा मतदारसंघात वाजणार महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांची शिट्टी
ज्येष्ठ व अभ्यासू नेते ऍड.आण्णाराव पाटील यांची रणनिती सरस ठरणार
===================================
बीड (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मराठवाड्यात बीडची लोकसभा नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते ऍड.आण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत हजारे हे निवडणूक लढविणार आहेत. गुरूवारी हजारे यांनी उमेदवारी अर्ज बीड येथून प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या चंद्रकांत हजारे यांना मतदारांची पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण, बीडची जनता घराणेशाहीला कंटाळली असून नव्या पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यामुळे हजारे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ व अभ्यासू नेते ऍड.आण्णाराव पाटील हे सत्ताधाऱ्यांना जोरदार हबाडा देणार हे दिसून येत आहे. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीची शिट्टी वाजणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एवढे मात्र निश्चित.
राज्यात नेहमीच चुरशीची ठरणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात यावेळेला मतदार नव्या चेहऱ्याला संधी देऊन इतिहास घडवू शकतात अशी चर्चा बीड मतदारसंघात व राजकीय वर्तुळात केली जात आहे. कारण, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघाची ओळख देशपातळीवर आहे. त्यामुळे बीडची चर्चा नेहमीच देशपातळीवर होताना दिसते. यावेळी देखील गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. असे असले तरी पंकजाताई मुंडे यांचा गेल्या काही महिन्यांपासून जनतेशी नसलेला संपर्क, मराठा समाज आणि धनगर समाज यांची आरक्षण विषयावर असलेली भाजपा वरील नाराजी, वाढती महागाई, बंद असलेली नौकरभरती, शेतकरी - शेतमजूर यांच्या प्रश्नांचा भाजपाला पडलेला विसर, बीड - अहिल्या नगर रेल्वे मार्गाचे संथ गतीने सुरू असलेले काम, ऊसतोड मजूरांबाबत सरकारचे उदासीन धोरण, बीड जिल्ह्यातील विकासाचे सर्व प्रश्न सोडवण्यात भाजपाला आलेले अपयश, बीड जिल्ह्यात उपलब्ध मंजूर खासदार निधी खर्च न करणे, भ्रष्टाचाराला अभय व संरक्षण, पक्ष फोडाफोडीचे अभद्र व खालच्या पातळीवरील राजकारण, कॉंग्रेसच्या घराणेशाहीला प्रखर विरोध आणि आपल्या घराणेशाहीचा उजळमाथ्याने पुरस्कार असे भाजपचे दुतोंडी वागणे, भाजपामुळे भारतीय लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. देशात अघोषित हुकूमशाही सुरू असल्याचे सर्वसामान्य जनतेचे मत बनले आहे आदी विविध बाबींवर भारतीय जनता व सुज्ञ मतदार नाराज आहेत. तशातच भाजप नेत्यांची मागील काही दिवसांत सामान्य जनतेशी तुटलेली नाळ, मुंडे साहेबांचे दुरावलेले कार्यकर्ते, यामुळे प्रस्थापित स्वार्थी, दलबदलू व ढोंगी राजकारणाला बीड जिल्ह्यातील जनता आता कंटाळली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळेला प्रस्थापितांना धक्का देत मतदार नव्या चेहऱ्याला संधी देऊन इतिहास घडवू शकतात अशी चर्चा सध्या बीड लोकसभा मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ व अभ्यासू नेते ऍड.आण्णाराव पाटील यांनी या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास व विचार करून महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत हजारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. हजारे हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथिल रहिवाशी आहेत. हजारे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. ते नेहमीच सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, तळागाळापर्यंत असलेला जनतेचा थेट संपर्क, उच्चशिक्षित, प्रभावी वक्ते, जनमाणसांत असलेली स्वच्छ प्रतिमा या सर्व चंद्रकांत हजारे यांच्या जमेच्या बाजू आहेत. सर्व सामान्यांसाठी अन्यायाविरूद्ध आवाज उठविणारा हक्काचा कार्यकर्ता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. राष्ट्रीय नेते ऍड.आण्णाराव पाटील यांच्यासोबतचा त्यांचा राजकीय क्षेत्रातील अनुभव मोठा आहे. त्यामुळे बीड लोकसभेत असणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघाची व तेथील प्रश्नांची हजारे यांना चांगलीच जाण व सखोल अभ्यास आहे. यासोबतच महापुरूषांच्या विचारांचा जागर ते आपल्या प्रबोधनातून नेहमीच करीत असतात. त्यामुळे निष्कलंक व आश्वासक चेहरा बीड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आल्याने बीड लोकसभा मतदारसंघातील जनतेला आता चंद्रकांत हजारे यांच्या रूपाने नवा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे बीडची जनता यावेळी इतिहास घडवेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीची शिट्टी वाजणार, मतांच्या ध्रुवीकरणावरच बीडच्या विजयाचे गणित अवलंबून..!
गेल्या चार निवडणुकीपासून भाजप-सेना युतीला साथ देणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघातील विजयाच्या गणितात बदल झालेला नाही. मतांच्या ध्रुवीकरणावरच विजयी उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विकास आघाडी या ध्रुवीकरणात किती महत्त्वाची भूमिका निभावते, याबाबत आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेला बीड हा लोकसभा मतदारसंघ काही अपवाद वगळता १९९५ नंतर भाजप-सेना युतीच्या ताब्यात आहे. १९९५ ते २०१४ या पाचही निवडणुकीत युतीचा उमेदवार भाजपने बदलला नाही. दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दु:खद निधनानंतर त्यांच्या कन्या डॉ.प्रीतमताई मुंडे दोन वेळा आणि आता त्यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजाताई मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा, वंजारी, धनगर आणि मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा युतीला होतो. हा आजवरचा अनुभव आहे. गतवेळी वंचितने ही लक्षवेधी मते घेतली होती. तर बीड जिल्ह्यात बहन मायावती यांच्या बसपाने ही वेळोवेळी लक्षनिय मते घेतली आहेत.
कुठपर्यंत तुमची गुलामी करायची..?
महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही पण, निवडणूक लढवु इच्छितो कुठपर्यंत तुमची गुलामी करायची. आलटुन - पालटुन तुमच्याच घरात सत्ता. हि घराणेशाही बीडच्या जनतेवर का लादता. तुम्ही मराठा - धनगर - मुस्लिम समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून सत्तेचा वापर केला आहे. आता यांचीच मते तुम्हाला हवी आहेत. मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे. तर वंचित समाज बांधव, घटकांच्या हक्कांचे तुम्ही रक्षण केले नाही. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, श्रमजीवी आणि विद्यार्थी यांना भाजपने जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. मग, सर्वसामान्य माणसाला लोकशाहीत काही किंमत आहे का नाही ? आमच्या न्याय हक्कांसाठी आम्हाला मैदानात उतरावेच लागेल.
- चंद्रकांत हजारे,
(उमेदवार - महाराष्ट्र विकास आघाडी, बीड लोकसभा.)
===================================
Comments
Post a Comment