बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पंकजाताईंना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवा : आ.नमिताताई मुंदडा

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पंकजाताईंना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवा : आ.नमिताताई मुंदडा

पंकजाताईंच्या विजयात योगदान देण्यासाठी आ.नमिता मुंदडांचा डोअर-टू-डोअर प्रचार

================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

लोकसभेच्या बीड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा सरसावल्या असून डोअर टू डोअर प्रचार करत त्या अंबाजोगाई शहर पिंजून काढत आहेत. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पंकजाताईंना लोकसभेवर विक्रमी मताधिक्याने पाठविण्याचे आवाहन आ.मुंदडा यांनी जनतेला केले आहे. 

लोकसभेच्या बीड मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची तरी जसजशी जवळ येत आहे तसे पंकजाताई यांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. केज मतदार संघात पंकजाताई मुंडे यांच्या विजयसाठी मुंदडा कुटुंब अहोरात्र परिश्रम घेत आहे. आ.नमिता मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा या तिघांनीही पूर्णपणे झोकून देऊन प्रचार सुरू केला आहे. दुपारपर्यंत मतदार संघातील ग्रामीण भाग तर सायंकाळी अंबाजोगाई शहरात प्रत्येक दिवशी एका प्रभागात डोअर-टू-डोअर प्रचार करून आ.नमिता मुंदडांनी शहर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत आ.नमिता मुंदडा यांनी शहरातील श्री.योगेश्वरी देवी मंदीर, गुरुवार पेठ, मंडी बाजार, पाटिल चौक, काळम पाटिल गल्ली, चौभारा, जिरे गल्ली, सातपुते गल्ली, करबला वेस, पटाईत गल्ली, बाराभाई गल्ली, राम मंदिर, पाटील चौक या भागातील सर्व घरांमध्ये जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप केले. मतदारांना पंकजाताई मुंडे यांच्या ग्रामविकास मंत्री पदाच्या कार्यकाळातील विकासकामांचे स्मरण करून देत आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पंकजाताईंना लोकसभेवर विक्रमी मताधिक्याने पाठविण्याचे आवाहन आ.मुंदडा यांनी केले आहे.

================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)