समताधिष्ठित समाजनिर्मिती‌ मध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान - हेमंत धानोरकर

समताधिष्ठित समाजनिर्मिती‌ मध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान - हेमंत धानोरकर

अंबाजोगाईत विविध उपक्रम राबवून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

=================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय, संत सावता माळीनगर येथे अभिवादन रॅली, प्रबोधनपर व्याख्यान, रक्तदान शिबीर आदींसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव समितीकडून माळी समाजाचा गुगल फॉर्मद्वारे जनगणनेस प्रारंभ करण्यात आला.

क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने गुरूवार, दि ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले वसतिगृहामध्ये असलेल्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले चौकाच्या नामफलकास अभिवादन करण्यात आले. त्या नंतर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, परळी रोड पासून संघर्षभूमी चनई या ठिकाणापर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संघर्षभूमी वरील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास तसेच तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात  आले. यावेळी अभिवादन रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड.श्यामभाऊ तांगडे व ऍड.संदिप थोरात यांनी मौलिक मार्गदर्शन केले. अभिवादन रॅलीचा समारोप संघर्षभूमी येथे झाला. त्या नंतर स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ.सुरेश आरसुडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर शांतिनाथ बनसोडे हे होते. शिबीरात ४१ जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी डॉ.सुरेश आरसुडे यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. रक्तदान शिबीरानंतर आयोजित प्रबोधनपर व्याख्यानातून सहशिक्षक हेमंत धानोरकर यांनी महात्मा फुले यांचे जीवन व कार्य या विषयावर बोलताना क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याची ओळख व्याख्यानातून करून दिली. ते म्हणाले की, म.फुले हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकऱ्यांचा आसूड हा म.फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. या पुस्तकातून त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. त्यांनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे. त्यांनी विपुल लेखन केले आहे. समताधिष्ठित समाज निर्मिती मध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान आहे अशी माहिती देवून तरूणांनी स्वावलंबी होऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा असे आवाहन केले. तसेच यावर्षी अंबाजोगाई शहरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरातील एकूण माळी समाजाची लोकसंख्या किती आहे. समाजाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थिती काय आहे हे समजावे यासाठी गुगल फॉर्म द्वारे जनगणनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दोन कुटुंबांची ऑनलाईन स्वरूपात नोंदणी देखील करण्यात आली. तसेच एमपीएससी मधून टॅक्स असिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल सागर श्रीहरी साखरे यांचा उत्सव समितीकडून महात्मा फुले लिखित ग्रंथ, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वयंवर मंगल कार्यालय नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल सिद्राम तुकाराम घोडके यांचा ही समितीच्या वतीने सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. प्रारंभी प्रदीप चोपणे व संचाने प्रबोधनपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बि.के.मसने यांनी केले. अरूण शिंदे यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मंगेश बलुतकर यांनी मानले. या सर्व कार्यक्रमांस अंबाजोगाई शहर व परिसरातील समाज बांधव, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक यांची उपस्थिती होती. जयंतीनिमित्त आयोजित सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी उत्सव समितीचे बळीराम चोपणे, बालासाहेब मसने, प्रकाश बलूतकर, राम घोडके, नंदकुमार बलूतकर, प्रदीप जिरे , बी.डी.माळी, विष्णु राऊत, राहुल माळी, संतोष राऊत, गोरमाळी सर, सुनील राऊत, पंकज राऊत, नितीन जिरे, सुरज राऊत, डॉ.सुशील शिंदे, अरूण शिंदे, प्रवीण चोपणे, कृष्णा मसने, आकाश चोपणे, पवन घोडके, दिनेश घोडके, शरद माळी, डी.आर.बनसोडे, अशोक बलुतकर, पवन जिरे, संदेश डाके, गणेश जाधव, सागर साखरे, सुधीर डाके, राम जिरे, अशोक बलूतकर, तुषार करपुडे, मनोज मसने, उदय घोडके, नवनाथ माळी, दिगंबर राऊत, सुमित राऊत, अनुज घोडके, धिरज घोडके, विष्णु जाधव, उज्ज्वल घोडके, राम जिरे, सिद्राम पाथरकर, अनिकेत घोडके, अभिनव घोडके, दिगांबर राऊत, तुषार करपुडे यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला.

================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)