बीड जिल्ह्यात भाजपाचे बुथ विजय अभियान पंकजाताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवणार

बीड जिल्ह्यात भाजपाचे बुथ विजय अभियान पंकजाताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवणार


प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करणार - भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांची माहिती

===================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रील पासून सहा दिवसीय ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार, या अभियानातर्गंत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढविण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघात आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्यासह मार्गदर्शनाखाली सर्व लोकप्रतिनिधी जिल्हा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते विविध उपक्रम हाती घेेणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिली.

‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या 6 दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येणार त्या अनुषंगाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबविले जातील. युवा वर्ग, महिला वर्ग असे समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठका ही घेण्यात येतील अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. भाजपा विरोधी समजल्या जाणार्‍या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य, योजना पोहोचवून भाजपाला मत देण्यासाठी त्यांचे मन वळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर रहाणार्‍या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल. शिवाय बूथ समिती व पन्नास प्रमुखांची नियुक्ती तसेच 100 हून अधिक जणांचा व्हॉट्सपग्रूप बनविण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बुथ कार्यकर्ते व पन्नास प्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बुथ अध्यक्षाला त्या त्या बुथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा तसेच मागच्या 3 निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्नास प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चा होणार असून उद्याच्या 6 एप्रिल रोजी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त बीड जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

===============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)