देशहितासाठी सक्षम मोदी सरकारला निवडून द्या - आ.नमिताताई मुंदडा
पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडांनी अंबाजोगाई शहर पिंजून काढले
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
बीड जिल्ह्यातील लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना लाखोंची लीड देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवा आणि व्यापक देशहितासाठी सक्षम मोदी सरकारला पुन्हा एकदा निवडून आणण्यात योगदान द्या असे आवाहन केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातील नागरिकांना केले.
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आ.नमिताताई मुंदडा अंबाजोगाई शहरात दररोज डोअर टू डोअर प्रचार करत आहेत. आतापर्यंत आ.मुंदडांनी अर्धे शहर पिंजून काढले आहे. आबालवृद्ध सर्व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत. स्थिर आणि खंबीर मोदी सरकारच्या काळात देश वेगाने प्रगती करत असून महासत्ता होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. ट्रिपल तलाक रद्द करण्यासारखा मोठा सामाजिक निर्णय घेतला असून त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याचे सूतोवाच मोदी सरकारने केले आहे. उज्ज्वला योजनेतून कोट्यवधी महिलांना सिलेंडर देण्यात आले आहेत. तर, लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यासोबतच शेतकरी, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी असे सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या दीर्घकालीन उज्वल भविष्यासाठी मोदी सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. देशाचा विकासाचा चढता आलेख कायम ठेवण्यासाठी मोदी सरकारला पुन्हा एकदा निवडून द्या. बीड जिल्ह्यातील लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाला बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा आणि देशाच्या विकासात आपले योगदान द्या असे आवाहन यावेळी आ.नमिताताई मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातील नागरिकांना केले.
==================================
Comments
Post a Comment