Posts

Showing posts from January, 2024

डिजिटल मिडिया परीषद अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अभिजीत लोमटे यांची सर्वानुमते निवड

Image
डिजिटल मिडिया परीषद अंबाजोगाईची कार्यकारिणी जाहीर  अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अभिजीत लोमटे,  कार्याध्यक्षपदी ऍड.जोगोजी साबणे तर सचिवपदी मोहम्मद फैजान शेख, उपाध्यक्षपदी संजय जोगदंड आणि मार्गदर्शक म्हणून सतिश मोरे यांची सर्वानुमते निवड ================================= संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषद अंबाजोगाई तालुक्याची सन 2024 - 2025 सालासाठीच्या कार्यकारणीची निवड मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यविश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशाने डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या सुचनेनुसार अंबाजोगाई तालुका डिजिटल मिडिया परिषद कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाट यांनी जाहीर केली. त्यानुसार डिजिटल मिडिया परिषद अंबाजोगाईच्या कार्याध्यक्षपदी ऍड.जोगोजी साबणे, तालुकाध्यक्षपदी अभिजीत व्यंकटराव लोमटे , सचिवपदी मोहम्मद फैजान शेख, उपाध्यक्षपदी संजय जोगदंड तर मार्गदर्शक म्हणून सतिश मोरे यांच्यासह सर्व कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार...

सुदर्शन रापतवार यांना "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार" जाहीर

Image
सुदर्शन रापतवार यांना "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार" जाहीर  ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे साहित्य संमेलनात होणार वितरण ================================= संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांना नांदेड येथील नानक साई फाऊंडेशनच्या वतीने "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार २०२४" जाहीर करण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आणि भक्त नामदेव पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी रोजी  श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन नांदेड येथे संत नामदेव मराठी साहित्य तथा ग्रंथ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पंजाब. येथील घुमान येथे संपन्न झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित हे संमेलन नांदेड येथील गुरूनगरीत...

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार 'साम' टीव्हीच्या सोनाली शिंदे यांना जाहीर

Image
३१ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे आयोजन : शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव अंबाजोगाई - संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार यंदा 'साम टीव्ही' च्या सोनाली शिंदे (मुंबई) यांना जाहीर झाला असून दि. ३१ जानेवारी बुधवार २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासोबतच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा देखील याच दिवशी होणार असल्याची माहिती अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय वृत्तपत्र सृष्टीत अगणित योगदान आहे. त्यांच्या प्रखर व तेजस्वी लेखणीने भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली. अशा महामानवाने 'मूकनायक' हे वृत्तपत्र ३१ जानेवारी १९२० रोजी उपेक्षित, शोषित, पिडीतांसाठी समर्पित केले. त्या निमित्ताने अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वती...

कवी दिनकर जोशी यांना अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण

Image
अ.भा.मराठी साहित्य संमेलनातील सहभागाने जोशींनी चौथ्यांदा वाढविला अंबानगरीचा नांवलौकिक ================================= अंबाजोगाई - संपादक रणजित डांगे  (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर द्वारा अमळनेर (जि.जळगाव) येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांचे कविसंमेलन - १ मध्ये सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण अंबाजोगाई येथील प्रख्यात कवी दिनकर जोशी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. पूज्य सानेगुरूजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर (जि.जळगाव) येथील "पूज्य सानेगुरूजी साहित्य नगरी" प्रताप महाविद्यालय या ठिकाणी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रविंद्र शोभणे हे भूषविणार आहेत. या साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाकरिता अंबाजोगाई येथील प्रख्यात कवी आणि ज्येष्ठ पत्रकार दिनकर जोशी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काव्यवाचन करण्यासाठीचा सतत चौथ्यांदा हा बहुमान जोशी यांना प्राप्त झाला आहे. शुक्रवार, दिनांक २ फेब्र...

माणसे जोडणाऱ्या सुनिलकाकांचा अंबाजोगाईकरांना कधीच विसर पडणार नाही - राजेसाहेब देशमुख

Image
▪️ जयंतीनिमित्त स्वाराती रूग्णालयात फळवाटप ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) अंबाजोगाईकरांचे आवडते व्यक्तीमत्व सुनिलकाका लोमटे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त रविवार, दिनांक १४ जानेवारी रोजी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ ते ५ या ठिकाणी रूग्णांना फळ आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माणसे जोडणाऱ्या, कायम जनसेवेसाठी उपलब्ध असलेल्या सुनिलकाकांचा विसर अंबाजोगाईकरांना कधीच पडणार नाही असे राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ ते ५ या ठिकाणी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दिग्विजय भास्करराव लोमटे, हरीशभाऊ वाघमारे आणि शाहीर मामा काळे यांच्या हस्ते रूग्णांना फळ आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, दिलीपराव काळे, शेख मुख्तार बागवान, समद कुरेशी, समीर शेख यांच्यासह रूग्णालयातील डॉक्टर, सिस्टर व स्टाफ उपस्थित होता. अंबाजोगाईकरांना सुनिलकाकांचा विसर कधीच पडणार नाही - राजेसाहेब देशमुख : दि...

लोकनेते सुनिलकाका लोमटे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Image
असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी, सुगंध दरवळत राहावा ।। लोकनेते सुनिलकाका लोमटे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! अभिवादक लोकनेते सुनिलकाका लोमटे सामाजिक प्रतिष्ठान, अंबाजोगाई, (जि.बीड.) ( Advt. )

अंबाजोगाईत सटवाजी ड्रीम सिटीचा शानदार उद्‌घाटन समारंभ ; मान्यवरांसह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती

Image
केएसबीएल ग्रुपच्या भव्य प्रकल्पाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद =================================== संपादक - रणजित डांगे  (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  काझी - संघाणी - बागवान - लोमटे ग्रुपचा नाविन्यपुर्ण प्रकल्प असलेल्या 'सटवाजी ड्रीम सिटी' या प्लॉटस् रो-बंगलोज व फ्लॅटचा विस्तीर्ण ३१ एकर वरील टाऊनशीप प्रकल्पाचे शुक्रवार, दि.१२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मान्यवरांसह प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांच्या उपस्थितीत व के.एस.बी.एल संचालक समीर काझी, अतुल संघाणी, शकील शेख, अनंतदादा लोमटे, यांच्यासह त्यांचे आई - वडील तसेच विष्णुपंत तात्या शेप, रामदास नाना शेप व त्यांचे बंधु आणि कुणाल लोमटे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. अंबाजोगाई शहरात प्रथमच ही ३१ एकरची भव्य-दिव्य टाऊनशिप आहे. केएसबीएल ग्रुपच्या भव्य प्रकल्पाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आपले स्वप्नातील आकर्षक घर, प्लॉट्स घेण्यासाठी नागरिकांनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन याप्रसंगी केएसबीएल ग्रुपचे करण्यात आले. सटवाजी ड्रीम सिटी ही अंबाजोगाई शहरात मध्यवस्ती मध्ये तब्बल ३१ एकरची भव्य - दिव्य नाविन्यपूर्ण रचनात्मक टाऊनशिप काझ...

श्रीराम जन्मभूमी हे राष्ट्रमंदिर आहे - सुप्रसिद्ध सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर

Image
मंगल कलश पुजन व दर्शन ; दिनदर्शिका प्रकाशन ==================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा व्याख्याते राहुल सोलापूरकर (पुणे) यांच्या ‘श्रीराम जन्मभूमी - इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, राजमाता जिजाऊ माँ साहेब, युगपुरूष स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मंगल कलश पुजन करण्यात आले. तर बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर, बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, संचालिका शरयूताई हेबा...

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते - डॉ.पांडुरंग बलकवडे

Image
सहकार भारती स्थापना दिवस ; मान्यवरांची उपस्थिती ==================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना प्रसिद्ध व्याख्याते डॉ.पांडुरंग बलकवडे यांनी "लोककल्याणकारी शिवराय व त्यांची राजनिती" या विषयावर आपले अभ्यासपूर्ण चिंतन मांडले. कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय, लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते डॉ.पांडुरंग बलकवडे, बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, इंजि.बिपीन क्षिरसागर, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी व मु...

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्माचे रक्षण केले - ह.भ.प.शिरीष महाराज मोरे

Image
दीनदयाळ बँकेची युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला ; वर्ष 22 वे ======================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प.शिरीष महाराज मोरे यांनी "शिवराज्याभिषेकाची 350 वर्षे" या विषयावर आपले मौलिक चिंतन मांडले. कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते ह.भ.प.शिरीष महाराज मोरे, बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, इंजि.बिपीन क्षिरसागर, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींच...

संभाजी ब्रिगेडच्या "महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्कारांचे 14 जानेवारी रोजी अंबाजोगाईत वितरण

Image
संभाजी ब्रिगेडच्या "महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्कारांचे 14 जानेवारी रोजी अंबाजोगाईत वितरण  - आयोजक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के यांची माहिती =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) येथील संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण रविवार, दि.14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता अंबाजोगाईत करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्रवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बाबासाहेब धन्वे (अंबाजोगाई) आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका मंजुषा माणिकराव शिंदे (परळी) यांचा पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा ही तमाम बहुजन समाजातील संघटनांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याची दखल घेऊन मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मागील 11 वर्षांपासून अंबाजोगाई शहरा...

वाढते अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बांधा - ओमकार चव्हाण

Image
भाजपा विद्यार्थी आघाडीचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन ; वाढते अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बांधा - ओमकार चव्हाण ================================= अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) वाढते अपघात रोखण्यासाठी मुख्य रस्त्यांवर ज्या शिक्षण संस्थांच्या शाळा, महाविद्यालये आहेत त्यासमोरील रस्त्यांवर तात्काळ गतिरोधक बांधा अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओमकार लालासाहेब चव्हाण यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले आहे. भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओमकार लालासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व वाढलेले अपघात लक्षात घेता गोदावरी कुंकुलोळ कन्या शाळा व योगेश्वरी मुलांची शाळा या विद्यालया समोरील मुख्य रस्त्यांवरील गतिरोधक तात्काळ बांधावेत. सार्वजनिक बांधकाम विभाग निवेदन देताना भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओमराजे चव्हाण, अमित माने, वैभव चिलवंत, विजानंद सोळंके इत्यादी उपस्थित होते. रस्त्यांवर तात्काळ गतिरोधक टाका : वाढते अपघात रोखण्यासाठी मुख्य रस्त्यांव...

सकारात्मक संदेश देणाऱ्या बातम्यांची समाजाला गरज - उपजिल्हाधिकारी शरद झाडके

Image
सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा ; दिनदर्शिकेचे प्रकाशन =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका - २०२४ चे प्रकाशन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते करण्यात आले. दि.6 जानेवारी हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. पत्रकारांची लेखणी समजाहितासाठी तळपली पाहिजे व गरजवंताला न्याय मिळाला पाहिजे या विधायक भुमिकेत वास्तवाचे दर्शन पत्रकार आपल्या लेखनीतून करीत असतात. याच विचारांची देवाणघेवाण व पत्रकारांना आपल्या नैतिक कामातून जनमाणसांत लोकप्रियता मिळवून देण्यासाठी व सांघिक भावना टिकून राहण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिनाचे आयोजन होत असते. याच धर्तीवर यशस्विपणे महाराष्ट्रात स्थापन झालेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचा ...

दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन

Image
दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन - दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांची माहिती =================================== अंबाजोगाई (संपादक रणजित डांगे)  "विश्‍वास, विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी व बँकेच्या सर्व सभासदांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून व्याख्यानमालेचा सहकुटूंब, सहपरिवार लाभ घ्यावा असे नम्र आवाहन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी सांगितले की, दीनदयाळ बँकेने 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 500 कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेव...

बीड येथील महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालयास लिंगायत समाजाचे नेते विनोद पोखरकर यांनी दिली भेट

Image
आमदार नमिताताई मुंदडा यांचे आभार ============================== बीड (संपादक रणजित डांगे - लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महायुती सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. त्या अंतर्गत बीड शहरात या महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आहे. बुधवार, दिनांक ३ जानेवारी रोजी लिंगायत समाजाचे युवा नेते विनोद पोखरकर (अंबाजोगाई) यांनी या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन जयंती उत्सव समितीच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा दिली. यावेळी बोलताना विनोद पोखरकर यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून तात्काळ सुरू केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार व्यक्त केले. सध्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असून आवश्यक ती रिक्त पदे तात्काळ भरली जावीत अशी मागणी केली. लिंगायत समाज बांधवांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये महामंडळाच्या कार्यालयात जाऊन महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट द्यावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी लिंगायत समाजातील गरजू बांधवांना अर्ज उपलब्ध आहेत. अशी माहिती संबंधित अधिकारी कळसणे यांनी दि...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) च्या लातुर जिल्हा लोकसभा आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
================================= लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) ची लातुर जिल्हा लोकसभा आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. नववर्षाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि.29 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह, लातुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक, मराठवाडा संघटक संजय तेलंग, मराठवाडा महिला संपर्कप्रमुख आम्रपाली गजशिव, बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, लातुरचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद साबळे आणि तालुका उपाध्यक्ष रवी उबाळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत  रेश्मा नौशाद शेख यांची लातुर महिला जिल्हा...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) यांच्या वतीने ज्येष्ठ नेते संजयआप्पा शेटे यांचा सत्कार

Image
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) यांच्या वतीने ज्येष्ठ नेते संजयआप्पा शेटे यांचा सत्कार = ====================== अंबाजोगाई (रणजित डांगे - संपादक, लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित लातुर जिल्हाध्यक्ष संजय आप्पा शेटे यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित लातुर जिल्हाध्यक्ष संजय आप्पा शेटे यांच्या लातुर येथील निवासस्थानी जाऊन शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे प्रकाश वेदपाठक, मराठवाडा संघटक संजय तेलंग यांनी शेटे आप्पा यांचा ह्रद्य सत्कार केला. यावेळी मराठवाडा महिला संपर्कप्रमुख आम्रपाली गजशिव, बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, लातुरचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद साबळे आणि तालुका उपाध्यक्ष रवी उबाळे, रेश्मा नौशाद शेख लातु...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या लाक्षणिक उपोषणाला अंबाजोगाईत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी यांचे प्रश्न सोडवा - तालुकाध्यक्ष अमर देशमुख  मुलभूत विषयांकडे शासनाचे दुर्लक्ष - माजी आमदार पृथ्विराज साठे ================================= अंबाजोगाई (रणजित डांगे - लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने नविन वर्षाची सुरूवातच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून करण्यात आली. सोमवार, दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंबाजोगाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतची पुर्वकल्पना पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अमर दगडूसाहेब देशमुख यांनी प्रशासनाला पुर्वीच दिली होती. उपोषण स्थळी बोलताना तालुकाध्यक्ष अमर देशमुख हे म्हणाले की, नवीन वर्षाच्या प्रारंभी सरकारने जनतेच्या गंभीर विषयांवर तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, शेतकऱ्यांना...