राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या लाक्षणिक उपोषणाला अंबाजोगाईत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलभूत विषयांकडे शासनाचे दुर्लक्ष - माजी आमदार पृथ्विराज साठे
=================================
अंबाजोगाई (रणजित डांगे - लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने नविन वर्षाची सुरूवातच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून करण्यात आली. सोमवार, दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंबाजोगाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतची पुर्वकल्पना पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अमर दगडूसाहेब देशमुख यांनी प्रशासनाला पुर्वीच दिली होती. उपोषण स्थळी बोलताना तालुकाध्यक्ष अमर देशमुख हे म्हणाले की, नवीन वर्षाच्या प्रारंभी सरकारने जनतेच्या गंभीर विषयांवर तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, शेतकऱ्यांना अनुदान, अग्रिम विमा, पिक विमा, रात्री ऐवजी दिवसा वीज द्यावी, आमचा विकासाला विरोध नाही. अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण हटावमुळे विस्थापित झालेल्या छोट्या - छोट्या व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे तालुकाध्यक्ष देशमुख म्हणाले. तर यावेळी बोलताना माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी सांगितले की, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक, महिला, व्यापारी बांधव यांच्या मागण्यांकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी डॉ.नरेंद्र काळे, सुरेशतात्या पाटील यांच्यासह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे व सामान्य जनतेच्या प्रश्नांमुळे जनता त्रस्त झालेली आहे. तरी पुढील विविध मागण्या संदर्भात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मागण्या अशा १) शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा व अनुदान तात्काळ जमा झाले पाहीजे., २) २५ टक्के अग्रीम अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम मिळाले पाहीजे., ३) शेतकऱ्यांचे विज बील माफ करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडीत विजपुरवठा चालू राहीला पाहीजे व विद्युत ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाल्यावर तात्काळ बदलुन देण्यात यावा., ४) जे शेतकरी नियमित कर्ज भरणा करतात त्या शेतकऱ्यांना रूपये ५० हजार अनुदान खात्यात जमा करा., ५) केज मतदारसंघातील व अंबाजोगाई तालुक्यातील सध्या चालु असलेल्या विविध विकास कामांच्या गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी., ६) अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणामुळे विस्थापित झालेल्या छोट्या-छोट्या व्यावसायीकांना पर्यायी व्यवस्था करण्यात यावी., ७) केज विधानसभा मतदारसंघातील शेतमजुर व बांधकाम मजुर यांच्या अंबाजोगाई रेशनकार्ड मध्ये त्यांची नांवे शेतकरी कुटुंबामध्ये समावेश झालेली आहेत. त्या नांवांचा पी.एच.एच. मध्ये समावेश करण्यात यावा., ८) केज विधानसभा मतदारसंघातील सर्व झोपडपट्टी धारकांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचा तात्काळ लाभ देण्यात यावा. या मागण्यांचा समावेश आहे. सदरील निवेदनावर मोठ्या प्रमाणावर नांवे आहेत. तर निवेदन देताना माजी आमदार पृथ्विराज साठे, भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे, डॉ.नरेंद्र काळे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, सुरेशतात्या पाटील, शेख रौफभाई, इम्रान पठाण, संजीवनी देशमुख, बालाजी शेरेकर, कल्याण भिसे, अंकुश ढोबळे, यशोधन लोमटे, हमीद चौधरी, रणजित मोरे, तस्लीम इनामदार, शेख समद, तानबा लांडगे, भगवान ढगे, सुधाकर जोगदंड, आश्रूबा करडे, शेख मुनवर, अविनाश साठे, बबनराव आपेट, विठ्ठल वैरागे, गणेश शेप, अंकुश आडे, देविदास देवकते, व्यंकट मुंडे, अमन परदेशी, प्रशांत पवार, माऊली मांदळे आदींसह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक उपस्थित होते.
===================================
Comments
Post a Comment