सुदर्शन रापतवार यांना "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार" जाहीर



सुदर्शन रापतवार यांना "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार" जाहीर 

४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे साहित्य संमेलनात होणार वितरण

=================================

संपादक - रणजित डांगे 

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांना नांदेड येथील नानक साई फाऊंडेशनच्या वतीने "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार २०२४" जाहीर करण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आणि भक्त नामदेव पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी रोजी  श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन नांदेड येथे संत नामदेव मराठी साहित्य तथा ग्रंथ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पंजाब. येथील घुमान येथे संपन्न झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित हे संमेलन नांदेड येथील गुरूनगरीत भरविले जात आहे. या संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची बाणी, विचार याबाबत विचारमंथन, चर्चा, व्याख्यान, ग्रंथदिंडी, कवीसंमेलन आणि नानक साई फाऊंडेशनच्या पुरस्करांचे वितरण आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. २०२४ चा भक्त नामदेव साहित्य पुरस्काराचे वितरण ही याच भव्य दिव्य कार्यक्रमात होणार आहे. सुदर्शन रापतवार हे अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार असून मागील चार दशकांपासून ते पत्रकारिता, सामाजिक आणि साहित्य सेवेशी निगडित आहेत. त्यांच्या या सर्व कामांची दखल घेऊन नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार २०२४" साठी त्यांची निवड केली आहे. सुदर्शन रापतवार यांची "भक्त नामदेव साहित्य पुरस्कार" साठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.


==================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)