वाढते अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बांधा - ओमकार चव्हाण
भाजपा विद्यार्थी आघाडीचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन ; वाढते अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बांधा - ओमकार चव्हाण
=================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
वाढते अपघात रोखण्यासाठी मुख्य रस्त्यांवर ज्या शिक्षण संस्थांच्या शाळा, महाविद्यालये आहेत त्यासमोरील रस्त्यांवर तात्काळ गतिरोधक बांधा अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओमकार लालासाहेब चव्हाण यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले आहे.
भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओमकार लालासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व वाढलेले अपघात लक्षात घेता गोदावरी कुंकुलोळ कन्या शाळा व योगेश्वरी मुलांची शाळा या विद्यालया समोरील मुख्य रस्त्यांवरील गतिरोधक तात्काळ बांधावेत. सार्वजनिक बांधकाम विभाग निवेदन देताना भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओमराजे चव्हाण, अमित माने, वैभव चिलवंत, विजानंद सोळंके इत्यादी उपस्थित होते.
रस्त्यांवर तात्काळ गतिरोधक टाका :
वाढते अपघात रोखण्यासाठी मुख्य रस्त्यांवर ज्या शिक्षण संस्थांच्या शाळा, महाविद्यालये आहेत. त्या समोरील रस्त्यांवर तात्काळ गतिरोधक बांधणे गरजेचे आहे. कारण, अपघातांसोबतच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीच कारवाई केली नाही तर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आघाडी तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.
- ओमराजे लालासाहेब चव्हाण
(तालुकाध्यक्ष, भाजपा विद्यार्थी आघाडी.)
================================
Comments
Post a Comment