रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) यांच्या वतीने ज्येष्ठ नेते संजयआप्पा शेटे यांचा सत्कार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) यांच्या वतीने ज्येष्ठ नेते संजयआप्पा शेटे यांचा सत्कार=

======================

अंबाजोगाई (रणजित डांगे - संपादक, लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित लातुर जिल्हाध्यक्ष संजय आप्पा शेटे यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित लातुर जिल्हाध्यक्ष संजय आप्पा शेटे यांच्या लातुर येथील निवासस्थानी जाऊन शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे प्रकाश वेदपाठक, मराठवाडा संघटक संजय तेलंग यांनी शेटे आप्पा यांचा ह्रद्य सत्कार केला. यावेळी मराठवाडा महिला संपर्कप्रमुख आम्रपाली गजशिव, बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, लातुरचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद साबळे आणि तालुका उपाध्यक्ष रवी उबाळे, रेश्मा नौशाद शेख लातुर महिला जिल्हाध्यक्षा, सुमन रामभाऊ मांदळे (महिला उपाध्यक्षा लातुर तालुका), मिरा दिपक कांबळे (लातुर जिल्हा महिला संपर्कप्रमुख), उज्ज्वला शामसुंदर वाघमारे (जिल्हाध्यक्षा, आंगणवाडी कर्मचारी संघटना, लातुर), माणिक नारायण आदमाने (संघटक - लातुर तालुका) आणि ऍड.लिलावती घनघाव (लातुर जिल्हा कायदेशीर सल्लागार) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)