रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) च्या लातुर जिल्हा लोकसभा आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद
=================================
लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) ची लातुर जिल्हा लोकसभा आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि.29 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह, लातुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक, मराठवाडा संघटक संजय तेलंग, मराठवाडा महिला संपर्कप्रमुख आम्रपाली गजशिव, बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, लातुरचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद साबळे आणि तालुका उपाध्यक्ष रवी उबाळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत
रेश्मा नौशाद शेख यांची लातुर महिला जिल्हा अध्यक्षा, सुमन रामभाऊ मांदळे यांची महिला उपाध्यक्षा लातुर तालुका, मिरा दिपक कांबळे यांची लातुर जिल्हा महिला संपर्कप्रमुख, उज्ज्वला शामसुंदर वाघमारे यांची अंगणवाडी कर्मचारी संघटना लातुर जिल्हा अध्यक्षा, माणिक नारायण आदमाने यांची संघटक - लातुर तालुका आणि ऍड.लिलावती घनघाव यांची लातुर जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) या पक्षाने केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर गट) अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकत्याच झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) बैठकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील जागा लढविण्याचा निर्धार सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) च्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत तसेच पक्ष वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन ठराव पारित करण्यात आला. सध्या राजकीय पटलावर राजकीय प्रमुख पक्षापेक्षाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) ला मानणाऱ्या मतदारांची संख्या पाहता स्वबळावर निवडणूक लढवून सर्व जागी उमेदवार उभे केल्यास प्रस्थापितांना पराभव पहावा लागेल. अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्यास मदत होईल. लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या उमेदीने आणि ताकदीने सक्रिय झालेला आहे. सध्या देश पातळीवर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असले तरी वैचारिक भूमिका घेऊनच या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार वाटचाल सुरू आहे. आमची भूमिका आमचा विचार व आमचे स्वातंत्र्य जो मान्य करेल. त्या पक्षासोबतच भविष्यात वेळ आली तरच त्यांना सोबत घेतले जाईल. अन्यथा स्वयं ताकदीवर निवडणुका लढविण्यास आपण सज्ज आहोत असे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक यांनी स्पष्ट केले.
==================================
Comments
Post a Comment