बीड येथील महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालयास लिंगायत समाजाचे नेते विनोद पोखरकर यांनी दिली भेट


आमदार नमिताताई मुंदडा यांचे आभार ==============================

बीड (संपादक रणजित डांगे - लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महायुती सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. त्या अंतर्गत बीड शहरात या महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आहे. बुधवार, दिनांक ३ जानेवारी रोजी लिंगायत समाजाचे युवा नेते विनोद पोखरकर (अंबाजोगाई) यांनी या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन जयंती उत्सव समितीच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा दिली.

यावेळी बोलताना विनोद पोखरकर यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून तात्काळ सुरू केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार व्यक्त केले. सध्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असून आवश्यक ती रिक्त पदे तात्काळ भरली जावीत अशी मागणी केली. लिंगायत समाज बांधवांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये महामंडळाच्या कार्यालयात जाऊन महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट द्यावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी लिंगायत समाजातील गरजू बांधवांना अर्ज उपलब्ध आहेत. अशी माहिती संबंधित अधिकारी कळसणे यांनी दिली. बीज भांडवल, थेट कर्ज, वैयक्तिक कर्ज, गट कर्ज, शैक्षणिक कर्ज, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, उद्योग व्यवसाय या बाबतीत जे अर्ज करू इच्छितात त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन विभागप्रमुख भोसले यांनी विनोद पोखरकर यांना दिले. तर लिंगायत समाजाने पहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होताना दिसले. याचा मोठा आनंद होत आहे. असे म्हणत महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्याने स्थापन झालेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत समाजकल्याण विभाग, बीड येथे जाऊन कार्यलय व विभागप्रमुख भोसले यांचा जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमा भेट देऊन तसेच पेढे भरवून समस्त लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महात्मा बसवेश्वर उत्सव समिती अध्यक्ष विनोद सिद्रामआप्पा पोखरकर तसेच बसवेश्वर यादव, बलभीम धारेकर, सुरज बनाळे व सर्व मित्र परिवार उपस्थित होता.

आमदार नमिताताई मुंदडा यांचे आभार :

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ हे समाजातील सर्व युवकांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. याकरिता पाठपुरावा करून वेळोवेळी आम्हाला प्रत्येक सामाजिक कार्यात मदत व सहकार्य करून आम्ही आपल्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असे सांगणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते काकाजी, युवा नेते अक्षय भैय्या यांचे लिंगायत समाजाच्या वतीने खूप - खूप धन्यवाद व आभार. तसेच महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अडचण असेल तर समाज बांधवांनी (9765100200 /9765000200) क्रमांकांवर संपर्क करा.


- विनोद सिद्रामआप्पा पोखरकर

(विभागीय अध्यक्ष, बसव ब्रिगेड, मराठवाडा विभाग.)

=======================


Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)