गावचे नंदनवन करण्यासाठी उंदरी ग्रामस्थ सरसावले ; 10 हजार वृक्ष लागवडीचा केला निर्धार

भाजप नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन ======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) काळाची गरज ओळखून, संत तुकाराम महाराज यांचा पर्यावरण विषयक "वृक्षवल्ली आम्हा सोयरे- वनचरे..!" हा दृष्टा संदेश आचरणात आणण्याच्या व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून गावातील काही जाणत्या आणि दृष्ट्या व्यक्तींनी वृक्ष लागवड अभियानाची संकल्पना मांडली आणि पाहता - पाहता त्या अभियानास ग्रामपातळीवर सर्वस्तरांतून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. ही किमया केली आहे, केज तालुक्यातील 'उंदरी' या गावाने. वृक्ष लागवडीेतून गावात नंदनवन फुलविण्यासाठी लोकसहभागातून दहा हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प बीड जिल्ह्यातील उंदरी ग्रामस्थांनी केला असून या मोहिमेचा शुभारंभ रविवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. भाजप नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबेजोगाई येथील मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया हे होते. राहुल सोनवणे, ॠषिकेश आडसकर, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे बीड जिल्...