जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी "स्पर्धा परीक्षा हा एकमेव राजमार्ग" : विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे



प्रवीण अकॅडमीच्या एकदिवसीय कार्यशाळेतून भावी अधिकाऱ्यांना बांधिलकीचे धडे

=======================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे 

(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) 

आजच्या या स्पर्धामय युगात शासकीय अधिकारी होण्याची मोठी स्वप्ने बाळगणारी तरूणाई सर्वत्र पाहण्यात येत आहे. अगदी लहानशा खेड्यापासून ते मेट्रो सिटी मधील तरूण - तरूणी दरवर्षी प्रशासनामध्ये आपली सेवा देण्यासाठी तसेच स्वतःचे व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करताना दिसत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्या विद्यार्थ्याला 'अभ्यास ते अधिकारी' ही मजल गाठायची असते व त्यामुळे जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी कर्तव्यदक्षतेने व डोळसपणे योग्य निवाडा देण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा त्यांच्यासाठी एकमेव राजमार्ग असल्याचे प्रतिपादन  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध लेखक तथा यश तज्ज्ञ व विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी प्रवीण अकॅडमी, सीबीएस परिसर, नाशिक येथे आयोजित एमपीएससी व यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिरात केले.



यावेळी प्रवीण जगताप - संचालक, प्रवीण अकॅडमी, नाशिक हे अध्यक्षस्थानी तर  प्रमुख मार्गदर्शक म्हणून आई सेंटरचे संस्थापक तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे, आई सेंटरचे कॉर्पोरेट मॅनेजर संदीप आंबेसंगे (पुणे), प्रेरणादायी वक्ते राहुल बनसोडे (नाशिक) यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. पुढे बोलताना विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की, यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) व एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) यांच्यामार्फत प्रशासनात दरवर्षी अशा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांचं प्रमाण अत्यंत तुरळक आहे. तसेच, या पदांसाठी तयारी करणारे व परीक्षा देणाऱ्या  तरुण - तरूणींची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. "यूपीएससी आणि एमपीएससी ही जीवघेणी स्पर्धा आहे" असं जरी तयारी करणारे विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच तज्ज्ञ व्यक्ती मानण्याचे मुख्य कारण म्हणजे यात यूपीएससी मध्ये दरवर्षी जवळपास 12 ते 13 लाख विद्यार्थ्यांच्या अर्जांमधून 150 ते 200 च्या दरम्यान आयएएस अधिकारी 100 ते 150 च्या आसपास आयपीएस अधिकारी त्यानंतर आयएफएस, आय आर एस, तसेच ग्रुप ए व ग्रुप बी अशी एकूण 28 अधिकारी संवर्गातील 900 ते 1000 पदे भरली जातात. अगदी याचप्रमाणे एमपीएससी मध्येही वर्ग-1 व वर्ग-2 च्या साधारण 300 ते 400 पदांची भरती केली जाते आणि येथे देखील 2 ते 3 लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांकडून अर्ज केले जातात. स्पर्धा परीक्षेचे भयानक असे वास्तव्य पाहता एका टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थ्यांची अंतिमत: सिलेक्शन म्हणजे निवड केली जाते. यासाठी कारणे ही तशीच आहेत. प्रशासनामध्ये अधिकतर जागा रिक्त असून सुद्धा भरती प्रक्रिया ही अगदी 30 ते 50 टक्के या प्रमाणात केली जाते  तसेच साधारणपणे अभ्यासा सोबतच परीक्षेचे वेळापत्रक ते नियुक्तीपत्र प्राप्त करण्याचा एक ते दोन वर्षांचा कालावधी लागतो. यामुळेच बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये अधिक चुरस निर्माण होण्याऐवजी स्थूलता व नैराश्य येऊन बेरोजगारीचे अधिक प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांमध्ये अधिक सकारात्मक आणण्यासाठी यश तज्ज्ञ सर नागेश जोंधळे म्हणाले, असे असले तरीही आपण "ही पोस्ट मी मिळवणारच" या विश्वासाने जोमाने तयारी करून अंतिम  निवड यादीत स्थान मिळवणे हेच आपले उद्दिष्ट असायला हवे. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरूणांनी प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले व त्यांचे उत्साहाने स्वागत करीत आपल्या खास शैलीत समाधारक उत्तरे ही सर नागेश जोंधळे यांनी दिल्यामुळे तरूणांमध्ये नविन उत्साह संचारल्याचे वातावरण झालेले होते. यावेळी त्यांनी नाशिक व परिसरातील तरूणांना प्रशासनात आणण्यासाठी अतिशय तळमळीने कार्यरत असलेले प्रा.प्रविण जगताप व प्रविण अकॅडमी नाशिकची संपूर्ण टीम यांचे कार्यशैलीचे कौतुक करीत त्यांना व सर्व विद्यार्थ्यांना येऊ घातलेल्या तसेच पुढील परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करण्यासाठी मंगल कामना दिल्या. या मार्गदर्शन शिबिराचे प्रस्ताविक करून उपस्थितांचे आभार संचालक प्रा.प्रविण जगताप यांनी मानले.

=========================


==========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)