ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार यांची "सिंहासन" ही कविता...



सद्य राजकीय परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना जे वाटते, तेच नेमक्या शब्दांत मांडण्याचा कौतुकास्पद प्रयत्न ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार यांनी त्यांच्या "सिंहासन" या कवितेतून व्यक्त केला आहे. लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कच्या वाचकांसाठी ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार यांची "सिंहासन" ही कविता देत आहोत... - संपादक रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्य.)



सिंहासन


"सिंहासन" हे महाराष्ट्राच छान छान वाहऽवा,

स्वतंत्र भारतदेशाचा हा र्‍हदयांतरीचा ठेवा.


आता सत्तेत सर्व पक्षाचा सहभाग व्हावा,

हा माझा हा तुझा असा भेदभाव नसावा.


समविचारांच्या वल्गनांचा नकोच दावा,

देश सुधारणा एकात्मतेचाच भर असावा.


पक्ष स्पर्धेच्या निवडणूकीचा तो खर्च टाळावा,

जाणता असामान्य माणूस राज्यकर्ता शोधावा.


कार्यकर्त्यांचा द्वेष मत्सर टाळल्या जावा,

नकोच ते रात्री सहभोजन अन् तो विरोध दिवसा. 


मतदारांना अश्वासनांचा नुसताच भरोसा,

विरोध टाळा लोकशाहीचा हा संदेश नवा.  


विकासाच्या पाऊलावर प्रत्येकाच सहभाग हवा,

विकसनशिल भारताचा असा इतिहास घडावा.


जावू द्या, जावू द्या राजकिय पक्षाची हवा,

येवू द्या माणसातून माणूसकीचा पक्ष नवा.


"सबका साथ, अपना विकास" सार्थक व्हावा,

सार्वभौमत्वाचा भारतध्वज विश्वात फडकावा.


- राजेंद्र रापतवार,

ज्येष्ठ कवी, अंबाजोगाई.

मोबाईल क्रमांक - 

9850986765

================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड