डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा.गौतम गायकवाड यांच्या ग्रंथास जाहीर

उल्लेखनिय यशाबद्दल प्रा.गायकवाड यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन

======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे 

(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

येथील प्रवर्तनवादी चळवळीतील आघाडीचे लेखक प्रा.गौतम गायकवाड यांच्या 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)' या ग्रंथास सन 2022 साठी दिला जाणारा राज्यस्तरीय "डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी" द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या बाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनिय यशाबद्दल प्रा.गायकवाड यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.



यापूर्वी याच संस्थेचा 'व्हि.जे.आरक' या ग्रंथास राज्यस्तरीय तृतीय, तर गतवर्षी "प्रज्ञासुर्याचे सुर्यपुत्र" या ग्रंथास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या उपरोक्त संस्थेचा सलग तिसरा पुरस्कार हा प्रा.गौतम गायकवाड यांना मिळाला आहे. ही विशेष बाब आहे. प्रा.गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे लेखक, कवी आणि विचारवंत आहेत. त्यांच्या समग्र व उल्लेखनिय कारकिर्दीची दखल घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी, लातूर यांच्या वतीने प्रा.गायकवाड यांनी लिहिलेल्या 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)' या ग्रंथास सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत अकॅडमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी कळविले आहे. त्यानुसार या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ.भालचंद्र ब्लड बँक, बसस्टँड शेजारी, लातूर येथे आयोजित एका विशेष समारंभात होणार आहे. हा पुरस्कार सुप्रसिध्द कादंबरीकार, कथाकार आणि अंमळनेर येथे होणाऱ्या नियोजित 97 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार (लातूर) तसेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.राजकुमार कलू मस्के (उदगीर) या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रा.गायकवाड यांना यापुर्वीही डॉ.जगजीवनराम लेखक पुरस्कार (नेपाळ), प्रेरणा समीक्षा पुरस्कार (पुणे), समाजभुषण पुरस्कार (सोलापुर), उत्कृष्ट लेखक पुरस्कार (लातूर) आणि व्ही.जे.आरक या ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रा.गायकवाड यांचे 16 हून अधिक पुस्तके, विविध वृत्तपत्र, नियतकालिकांतून लेखन, दहा पेक्षा अधिक ग्रंथांचे संपादन, त्यांनी केले आहे. या सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. अनेक चर्चासत्रात सहभाग घेत विविध नियतकालिकांतून त्यांचे अडीचशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. नवोदित लेखक, साहित्यिक, कवी यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच त्यांच्या ग्रंथ प्रकाशनासाठी सर्वोतोपरी भरीव मदत व सहकार्य करण्याचे कार्य देखिल प्रा.गायकवाड यांनी वेळोवेळी केले आहे. व्ही.जे.आरक सेवाभावी संस्था आणि परिवर्तन साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष ही आहेत. तसेच 'परिवर्तन संशोधन' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. परिवर्तन साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार आहे. आगामी काळात 11 विविध विषयांशी संबंधीत ग्रंथ, काव्य संग्रह, प्रवर्तनवादी चळवळीला बळ देणाऱ्या ग्रंथाचे लेखक म्हणून ही ते ओळखले जातात. या सर्व ग्रंथसंपदा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. प्रा.गौतम केरबा गायकवाड हे सध्या अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागील 32 वर्षांपासून अविरतपणे ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी नाटक, कथा, कविता, प्रासंगिक, संशोधन, संपादन आदी विपुल ग्रंथ व साहित्य संपदा निर्मिली आहे. त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी, लातूर यांच्या वतीने त्यांनी लिहिलेल्या 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)' या ग्रंथास सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल प्रा.गौतम गायकवाड यांचे सामाजाच्या सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.


================

========

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

आदर्श बंधू विनोद नरहरराव रापतवार