सुनिल सिरसाट यांची भाजपाच्या पंचायतराज - ग्रामविकास मराठवाडा विभागीय सह-संयोजकपदी निवड
सुनिल सिरसाट यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत
========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
अंबाजोगाई जवळ असलेल्या मौजे शेपवाडी येथील रहिवासी असलेले सुनिल सिरसाट यांना मतदानाचा अधिकार आला नव्हता तेंव्हापासून ते भाजपचे आणि स्व.गोपीनाथरावजी मुंडेचे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या २६-२७ वर्षांपासून त्यांच्याकडे पक्षातील, समाजातील एक परखड, निर्भीड व्यक्तीमत्व म्हणून त्यांची बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ओळख आहे. यापुर्वीही दरम्यानच्या काळात मुंडे साहेबांनी दोन वेळा भा.ज.यु.मो. तालुका कार्यकारिणीवर उपाध्यक्ष, सरचिटणीस म्हणून सिरसाट यांना संधी दिली होती. पक्षासाठी २४ तासातील १४ ते १६ तास पार्टीसाठी वेळ देणा-या विशेषतः प्रवाहाच्या विरोधात खंबीरपणे सातत्याने प्रयत्न करीत सर्व समाजात अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात मोठे काम असलेल्या कार्यकर्त्याची आज पुन्हा एकदा १२-१५ वर्षांनंतर पक्षाच्या कामासाठी निवड झाली असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच वाढला आहे. या निवडीने निष्ठावान कार्यकर्त्याला तर न्याय मिळालाच आहे. परंतु, मुळात सर्वसामान्यांचे काम करणारा कार्यकर्ता असी सुनिल सिरसाट यांची ओळख असल्याने आणि जोडीला ते गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचा शासन दरबारी विविध कार्यालयातील अधिकारी वर्गाशी चांगले संबंध असल्याचा फायदा तळागाळातील लोकांना होणार असल्याने त्यांना ओळखणारा वर्गही या निवडीने आनंदला आहे. या निवडीबद्दल सुनिल सिरसाट यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.अतुल सावे, माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मराठवाडा संयोजक गणेश काका जगताप, सह-संयोजक गजानन जोशी, प्रदेश कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी, विभाग संघटनमंत्री संजय कौडगे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अच्युतबापू गंगणे, माजी नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, संजय गंभीरे, सुरेशराव कराड, बिपीनदादा क्षीरसागर, दिनदयाळ बॅंकेचे चेअरमन ॲड.मकरंद पत्की, त्रिदल माजी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी सरपंच ग्यानदेव शेप, जि.प.सदस्य बालासाहेब शेप, शेपवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विष्णुपंत शेप, उपसरपंच बालासाहेब शेप, सर्व ग्रा.पं.सदस्यांसह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनिल सिरसाट यांचे अभिनंदन केले.
भाजपाचे धोरण आणि शासनाच्या योजना गोरगरीब - सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार - सुनिल सिरसाट
------------------------------
प्रदीर्घ कालावधीनंतर माझ्या निष्ठेचे फळ मला आज भारतीय जनता पार्टीने दिले आणि मला कोणत्या न कोणत्या स्वरूपाने काम करण्याची पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल मी भाजप प्रदेशाध्यक्ष, सन्माननिय राष्ट्रीय सचिव पंकजाताई, खासदार डॉ.प्रितमताई, संघटनमंत्री, राज्य आणि मराठवाडा संयोजक पंचायतराज व ग्रामविकास विभाग यांचा अगदी-अगदी मनःपुर्वक-सहह्रदयी अंतःकरणापासून आभारी आहे. येणा-या काळात पक्षाचे धोरण आणि शासनाच्या विविध योजना समाजातील तळागाळातील गोरगरीब - सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया सुनिल सिरसाट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
=========================
Comments
Post a Comment