युवा आंदोलनच्या मागणीला यश : राज्य सरकारने लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला

- युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांची माहिती ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या युवा आंदोलनच्या मागणीला यश आले आहे. तर राज्यातील हजारो सफाई कामगारांना दिलासा मिळाला आहे, कारण, राज्य सरकारने लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत अशी माहिती युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके (अंबाजोगाई) यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांनी सांगितले की, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मधील सफाई कामगारांना लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आम्ही युवा आंदोलनच्या वतीने महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे २० जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या निवेदनातून केली होती. सदरील निवेदनावर युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके, मुंबई जिल्हाध्यक्ष संजय साळवे, पुणे जिल्हाध...