कुंबेफळच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेची शैक्षणिक सहल



विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीतून मिळाली ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक माहिती

=========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजीटल मिडीया न्युज नेटवर्क) 

तालुक्यातील कुंबेफळ येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंबेफळ या शाळेची सन २०२२ - २३ या वर्षातील शैक्षणिक सहल अतिशय उत्साहात संपन्न झाली. सहलीच्या निमित्ताने ऐतिहासिक, भौगोलिक स्थळे पाहून आणि सांस्कृतिक विषयासंबंधीची मौलिक माहिती मिळाल्याने विद्यार्थी भारावले होते.



सोमवार, दि.१३ फेब्रूवारी ते बुधवार, दि.१५ फेब्रूवारी २०२३ या कालावधीत आयोजित केलेल्या या सहली मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ. ४ थी ते ७ वी वर्गातील एकूण ६१ विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना हजारे, सहलप्रमुख संतोष गायकवाड यांच्यासह निळकंठ जिरगे, मंगल मुंडे, ललिता जाधव, माधुरी तोडकर, एम.एम.गायकवाड, दत्ता कसबे यांनी विद्यार्थ्यांना सहली दरम्यान ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व या विषयासंबंधी माहिती दिली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पंढरपूरचे विठ्ठल मंदीर, नरसोबाच्या वाडीचा नदीघाट, कोल्हापूर येथील कन्हेरी मठ, छत्रपती शाहू महाराज पॅलेस, पुरातन कालीन महालक्ष्मी मंदीर, ज्योतीबाचा डोंगरमाळ, गणपती पुळेचा समुद्र किनारा, महाडचे चवदार तळे, रायगड किल्ला, प्रतापगड किल्ला, महाबळेश्वर या विविध सुप्रसिद्ध ठिकाणांना भेटी देऊन भारत देशाचा व महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास, गौरवशाली वारसा, प्राचीन परंपरा यांबद्दलची ओळख करून दिली. एस.टी. बसचालक शिंदे, जीप चालक व्यंकट इंगोले यांनी सहलीतील सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर केला, तर आम्रपाली सोनवणे व सविता तौर यांनी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था सांभाळली. सहलीसाठी कुंबेफळ गावचे सरपंच लिंगेश्वर तोडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालासाहेब बोर्डे, पत्रकार रोहीदास हातागळे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी साहेब, उपशिक्षणाधिकारी बोराडे मॅडम, गटशिक्षणाधिकारी शेख साहेब, केंद्रप्रमुख आर.डी.गिरी सर, केंद्रिय मुख्याध्यापक आवाड सर, तसेच माता व पिता पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)