प्रख्यात कवी दिनकर जोशी आंतरराष्ट्रीय बहुभाषिक कवि संमेलनात सहभागी होणार



काठमांडू (नेपाळ) येथे आंतरराष्ट्रीय बहुभाषिक कवि संमेलनाचे  21 फेब्रुवारीला आयोजन

========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आज मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आल्याबद्दल कविवर्य जोशी यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार तसेच सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

 


पुन्हा एकदा अंबानगरीचा सर्वदूर नांवलौकिक व अंबाजोगाईतील साहित्य रसिकांचा आनंद द्विगुणित होईल अशी महत्त्वपूर्ण घटना साहित्य क्षेत्रात या आठवड्यात घडून येत आहे. ते म्हणजे अंबाजोगाईचे प्रख्यात साहित्यिक व कवि दिनकर जोशी यांना आज 21 फेब्रुवारी रोजी अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरयात्रीचे 25 वे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन मा.ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेपाळच्या पवित्र भूमीत विश्व संमेलन म्हणून साजरे होत आहे. या आयोजित बहुभाषिक आंतरराष्ट्रीय कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड करून सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती अक्षरयात्री प्रतिष्ठानचे कार्यवाह अनिल पवार यांनी दिली आहे. तसेच निवडीचे पत्र राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्याकडून कविवर्य जोशी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. या बहुभाषिक आंतरराष्ट्रीय कवि संमेलनात साहित्य, संस्कृती व काव्य या विषयावर मौलिक चिंतन होणार आहे.


कविवर्य दिनकर जोशी यांचा परीचय :


दिनकर वासुदेवराव जोशी हे मागील 30 वर्षांपासून  काव्यलेखन करीत आहेत. त्यांना आद्यकवि मुकुंदराज काव्यरत्न पुरस्कार, कै.सुभद्राबाई बिवरे यासह विविध पुरस्कार प्राप्त असून त्यांनी सासवड आणि उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, पुणे फेस्टिव्हल येथे सलग पाच वर्षे आणि मराठवाडा साहित्य संमेलनासह महाराष्ट्रातील असंख्य साहित्य व काव्य संमेलनातून सहभागी होत काव्यगायन करून सतत 15 वर्षांपासून अंबानगरीचा नांवलौकिक वाढविला आहे. त्यांचा "आयुष्याचे अवघड ओझे" हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन (1995), मायबोली साहित्य संमेलन, सद्भावना सांस्कृतिक समारोह, अंबाजोगाई साहित्य संमेलन, बालझुंब्बड आदींचे यशस्वी आयोजन, संयोजन, संकल्पना, सहभाग व मार्गदर्शन करून अंबाजोगाईसह मराठवाड्यातील साहित्य चळवळीला बळ, प्रेरणा आणि नवा आयाम देण्याचे कार्य दिनकर जोशी हे आजपावेतो करीत आहेत. विविध सामाजिक व साहित्य संस्थांचे ते पदाधिकारी ही आहेत. सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहरात विविध साहित्यिक उपक्रम राबवून मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर कविंना सन्मानित करण्यात जोशी यांचा मोठा पुढाकार राहिला आहे. दिनकर जोशी हे योगेश्वरी शिक्षण संस्थेत सहशिक्षक आहेत. शिक्षण तसेच साहित्यासोबतच त्यांनी 25 वर्षे पञकारीता केली आहे. त्यांना कै.अनंतराव भालेराव शोध पञकारीता पुरस्कार, भिकाभाऊ राखे आदर्श पञकारीता पुरस्कार व कै.सा.ऊ.भारजकर शोध पञकारीता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जोशी यांनी नुकतेच एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 व 27 डिसेंबर 2022 रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही भूषविले आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आल्याबद्दल कविवर्य जोशी यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार तसेच सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.


========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)