जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे यश
५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या चि.यश अनंत घुले या विद्यार्थ्यांने पटकावला द्वितीय क्रमांक
=========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
बीड येथे संपन्न झालेल्या ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि.यश अनंत घुले याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. ही गोष्ट शाळेसाठी अत्यंत अभिमानाची आहे. या यशाबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे सर्व विज्ञान शिक्षक यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांतजी मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, शहरातील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी, सौ.कल्पनाताई चौसाळकर, अविनाश तळणीकर, मुख्याध्यापक आप्पाराव यादव, सौ.वर्षाताई मुंडे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष विजयराव वालवडकर, कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, शालेय समिती अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे, उपमुख्याध्यापक शंकर वाघमारे, पर्यवेक्षक अरूण पत्की, विभागप्रमुख प्रशांत पिंपळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
=======================
Comments
Post a Comment