एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांची नांवे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करा - अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे
अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर १ मार्च २०२३ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
तालुक्यातील राडी गावातील एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांची नांवे अन्नसुरक्षा योजनेत तात्काळ समाविष्ट करावीत अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज कोळगीरे यांच्यासह एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांनी अंबाजोगाईचे तहसीलदार यांना मंगळवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज कोळगीरे यांच्यासह एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांनी अंबाजोगाईचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे राडी गावातील ए.पी.एल.योजनेतील लाभार्थ्यांचे मिळणारे स्वस्त धान्य (रेशन) राज्य व केंद्र सरकारने बंद केलेले असून एपीएल योजनेत समाविष्ट अनेक शेतकरी कुटुंबिय हे अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. एपीएल योजनेत राडी गावातील दिव्यांग, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता, वयोवृध्द अशा अनेक नागरिकांचा समावेश आहे. त्यांना या सदरील योजनेपासून वंचित राहवे लागत आहेत. तरी मा.तहसिलदार साहेबांना विनंती की. "ए.पी.एल.शेतकरी" या योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांची नांवे ही "अन्नसुरक्षा" या योजने मध्ये तात्काळ समाविष्ट करून त्यांना "अन्नसुरक्षा" योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बुधवार, दिनांक १ मार्च २०२३ रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, या आंदोलना दरम्यान जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील याची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील निवेदनावर अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बिभीषण गंगणे व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज भरत कोळगीरे यांच्यासह एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या माणिक प्रभाकर जाधव, शिवाजी माणिकराव गंगणे, मधुकर गंगणे, शेख नूर शेख अली, सत्तार बागवान, मैदाबी शेख, आश्रुबा कस्पटे, अहमद शेख, विठ्ठल जाधव, सादेख पठाण, बळीराम वाघमारे, सत्तार शेख, दत्तू वाघमारे, उमर सय्यद, रविकिरण भिमराव बनसोडे, सल्लाउद्दीन सय्यद, यमुनाबाई वाघमारे, फारूख बागवान, सुरज वाघमारे, गोविंद कोळगीरे, युवराज कोळगीरे आदींसह लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई, नायब तहसिलदार, पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय, अंबाजोगाई यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
एपीएल योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश अन्नसुरक्षा योजनेत करावा :
=====================
मौजे राडी गावातील एपीएल योजनेतील लाभार्थ्यांचे मिळणारे स्वस्त धान्य (रेशन) राज्य व केंद्र सरकारने बंद केलेले असून एपीएल योजनेत समाविष्ट अनेक शेतकरी कुटुंबिय हे अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. एपीएल योजनेत राडी गावातील दिव्यांग, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता, वयोवृध्द अशा अनेक नागरिकांचा समावेश आहे. त्यांना या सदरील योजनेपासून वंचित राहवे लागत आहेत. तरी सरकारला विनंती की. "एपीएल शेतकरी" या योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांची नांवे ही "अन्नसुरक्षा" या योजने मध्ये तात्काळ समाविष्ट करून त्यांना "अन्नसुरक्षा" योजनेचा लाभ द्यावा, ही मागणी मान्य न झाल्यास पात्र लाभार्थी हे नाविलाजास्तव अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर बुधवार, दिनांक १ मार्च २०२३ रोजी आमरण उपोषण करण्यात येईल याची महसूल व पुरवठा विभागाने नोंद घ्यावी.
- गणेश गंगणे
(तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय किसान काँग्रेस, अंबाजोगाई.)
=======================
Comments
Post a Comment