मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे यश



मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या संघाने पटकावले तृतीय पारितोषिक

======================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) 

मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. ही गोष्ट शाळेसाठी अत्यंत अभिमानाची आहे.

या यशाबद्दल विजयी संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणारे संगीत शिक्षक जयेंद्रजी कुलकर्णी सर यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, उपाध्यक्ष जीतेशजी चापसी, कोषाध्यक्ष सत्यनारायणजी लोहिया, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांतजी मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, शहरातील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी, सौ.कल्पनाताई चौसाळकर, अविनाश तळणीकर, आप्पाराव यादव, सौ.वर्षाताई मुंडे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष विजयराव वालवडकर, कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, शालेय समिती अध्यक्ष डॉ.अतुलदादा देशपांडे, उपमुख्याध्यापक शंकर वाघमारे, पर्यवेक्षक अरूण पत्की, विभागप्रमुख प्रशांत पिंपळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

=====================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)