एकसंघ व बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी शिवरायांची नीतीच पथदर्शक - माजी नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे




श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा आढावा घेत महाराजांच्या युद्धनीती, राजनीती, मनुष्यबळ विकसन, अर्थनीती, समय व्यवस्थापन,कुटनीती, प्रशासन,कायदा व सुव्यवस्था, नारी सन्मान या विविध आयामांवर प्रकाश झोत टाकला. आणि त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची आजच्या समस्या निराकरणासाठीची उपयोगिता व पथदर्शकता स्पष्ट केली. एकसंघ व बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी शिवरायांची नीतीच पथदर्शक आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे यांनी केले.




येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, परकीय आक्रमणांना थोपविण्यासाठी एक युगपुरूष समोर येतो व भारताचे रक्षण करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आजही काही अपप्रवृत्तीचे लोक भारताच्या अखंडत्वाला बाधा पोहचविण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना धडा शिकविण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून शिकवण व प्रेरणा घेण्याची गरज आहे आहे. राम, कृष्णांच्या विचारांचा समन्वय म्हणजे राजे शिवछत्रपती होते. त्यांची गुप्तहेर संघटना अतिशय तत्पर व प्रभावी होती. केवळ जिंकण्यासाठी लढण्याचा विचार मनात होता. त्यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन केले, जीवास जीव देणारे मावळे घडवले. स्वराज्य बळकटीसाठी किल्ल्यांच्या बांधणी मागे दूरदृष्टी दिसून येते. व महाराजांची स्थापत्य शास्त्रातील प्रभुत्व ही लक्षात येते असे त्यांनी सांगितले."महाराष्ट्र गीता"ने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी शिवरायांवरील पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.अ.द.पत्की यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिकवण व प्रेरणा घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या अध्यापनातून छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे, शालेय समिती सदस्या सौ.नभा वालवडकर, किशन महामुनी, अर्थ समिती सदस्य प्रा.अशोक पाठक, साईनाथ उपरे, उपमुख्याध्यापक शंकर वाघमारे, पर्यवेक्षक अरूण पत्की, विभागप्रमुख प्रशांत पिंपळे, अभ्यासक्रम प्रमुख सुरेखा काळे, विश्वास पत्की, कार्यक्रम प्रमुख तुळशीराम देवकर तसेच सर्व शिक्षक बंधू, भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत घेवारे, प्रास्ताविक तुळशीराम देवकर यांनी केले, स्वागत व परिचय नवनाथ कदम यांनी तर उपस्थितांचे आभार सुशिल कुंबेफळकर यांनी मानले. मिलिंद जोशी यांनी शांति मंत्र सांगितला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.


========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)