Posts

Showing posts from May, 2025

कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंबाजोगईत आज राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार वितरण व व्याख्यान

Image
कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंबाजोगईत आज राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार वितरण व व्याख्यान युवा प्रतिष्ठान, अंबाजोगाईचा पुढाकार  =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) शोषित, पिडीत व उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी शासन, प्रशासन व प्रस्थापितांच्या विरोधात बंड करून सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य झिजविणारे कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रात उपेक्षित माणसांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळावी. यासाठी युवा प्रतिष्ठान, अंबाजोगाई यांच्या वतीने समाजात प्रबोधन करणारे, धम्म चळवळ गतीमान करून योगदान देणारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे ९ वे वर्ष आहे. कर्मवीर ऍड.एकनाथराव आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार-२०२५ चे वितरण व मान्यवरांचे व्याख्यान आज शनिवार, दि.२४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.विजय कुमठेकर (जालना) तर उद्घाटक म्हणून दिपक वजाळे (उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई.)...

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने २५ व २६ मे रोजी उंदरी येथे खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम ; पुरस्कार वितरण, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

Image
कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणचा उपक्रम २५ व २६ मे रोजी उंदरी येथे खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम ; पुरस्कार वितरण, शेतकरी मेळाव्याचे आयोजन ====================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नांवे असलेल्या स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने रविवार, दिनांक २५ व सोमवार, दिनांक २६ मे २०२५ रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे विविध उपक्रम तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच 'खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम' ही होणार आहे. या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे-पाटील आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. येथील कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थीप्रिय दिवंगत सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कर्मयोगी डॉ.बा...

काव्यसिंधू : शांतीदूत

Image
  ---------- ०   शांतीदूत ०------------------- (लहान बंधू विनोदजी रापतवार यांच्यासाठी मोठे बंधू राजेंद्र रापतवार यांचे सदिच्छा काव्य) सहजपणे हो म्हणण्याने अवघड काम ही होऊन जातं. सकारार्थी वायब्रेशन्सने यशाचं रहस्य उमलत राहतं. न कळणारी भाषा, शब्दांकन, हास्यानंही उमजून जातं. हसत जगणं हास्यात ठेवणं जगालाही जवळ आणतं. आदर ठेवून गोड बोलणं माणसं जोडण्यास कामी येतं. शब्दांना स्नेहात जुळवून माणुसकी जुळवणं शक्य होतं. आपल्याच रक्ताच्या नात्यानं वात्सल्यात मन रमत जातं. अन, प्रेम जिव्हाळा स्नेहाने रक्तापलीकडच नातं वाढतं. परधर्म, पंथ, सहिषाणुतेने एकात्मतेच दर्शन घडतं. भारत मातेचं हेच देणं शांतीदूताचा संदेश देतं. ~ © राजेंद्र नरहरराव रापतवार साहित्यिक अंबाजोगाई. मोबाईल क्रमांक : 9850986765

आदर्श बंधू विनोद नरहरराव रापतवार

Image
प्रासंगिक लेख : आदर्श बंधू विनोद नरहरराव रापतवार **************************************** अंबाजोगाईचे भुमिपुत्र विनोद वत्सला नरहरराव रापतवार (जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर) यांना कर्मवीर डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा "आदर्श बंधु भरत पुरस्कार-२०२४ जाहीर झाला आहे. २६ मे रोजी उंदरी ता.केज जि.बीड) येथे एका विशेष समारंभात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते विनोद रापतवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी उंदरी, ता.केज जि.बीड) येथे कृषी महाविद्यालय लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे त्यांचे ज्येष्ठ दिवंगत बंधू सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बालासाहेब ठोंबरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी मेळाव्याचे आयोजन करतात. कवि संमेलन भरवतात. विविध क्षेत्रातील गुणी जणांचा सन्मान करतात. यावर्षी ही दिमाखदार सोहळ्याचे आयोजन २५ आणि २६ में २०२५ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अंबाजोगाई येथील साहित्यिक राजेंद्र रापतवार यांनी त्यांचे लहान बंधू सत्कारमूर्ती विनोदजी रापतवार यांना दिलेल्या ...

---हार्दिक अभिष्टचिंतन..!---

Image
  ---हार्दिक अभिष्टचिंतन..!--- सन्माननीय श्री.अक्षय भैय्याजी, आपल्या दिलदार स्वभावाने आणि सहकार्याच्या नात्याने आपण अनेकांचे मार्गदर्शक व स्नेही बनलात. आज आपल्या कार्यक्षमतेची आणि समजूतदार नेतृत्वाची छाप प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. आपल्या मुंदडा कुटुंबाची लोकसेवेतील परंपरा ही प्रेरणादायी असून, त्याच मूल्यांचा वारसा तुम्ही समर्थपणे पुढे नेत आहात. आपणांस उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी‌ आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! शुभेच्छूक : संजय गंभीरे (शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी, अंबाजोगाई.) 🔸🔸🔸 (Advt.) ==================================== ---हार्दिक अभिष्टचिंतन..!--- आमचे नेते युवकांचे ह्रदयस्थान, केज मतदारसंघाचे युवा नेतृत्व मा.श्री.अक्षय भैय्या मुंदडा  भैय्यासाहेब आपणांस वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..! शुभेच्छूक - प्रताप भैय्या देवकर (युवा कार्यकर्ते - भारतीय जनता पार्टी, अंबाजोगाई.) 🔸🔸🔸 (Advt.) ==============================

खा.शरदचंद्रजी पवार यांची उद्योजक भरत गिते यांच्या तौरल इंडिया प्रा.लि.कंपनी येथे गौरवपूर्ण सदिच्छा भेट

Image
खा.शरदचंद्रजी पवार यांची उद्योजक भरत गिते यांच्या तौरल इंडिया प्रा.लि.कंपनी येथे गौरवपूर्ण सदिच्छा भेट “शरद पवार साहेबांची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत” -भरत गीते उद्योजक भरत गिते यांचे औद्योगिक क्षेत्रातील कार्य नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी ==================================== चाकण / पुणे (प्रतिनिधी - लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  तौरल इंडिया प्रायव्हेट.लि.कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या ॲल्युमिनियम मॅन भरत गिते "भरत गीते यांचा संघर्ष आणि प्रकल्प तरुणांसाठी प्रेरणादायी आहे" चाकण औद्योगिक वसाहतीमधील तौरल इंडिया प्रा. लि. या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन प्रकल्पास  खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री गित्ते यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान भरत गित्ते यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. या कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केले आहे. ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांनी औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. येणाऱ्या का...

परळी व अंबाजोगाई तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत ९३३ लाभार्थ्यांना ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी वितरीत

Image
आ.धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो बेघर, बेसहारा अनाथांच्या डोळ्यांतील पुसले अश्रु..! ====================================== परळी वैजनाथ (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)  माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदार संघाचे आ.धनंजय मुंडे व मंत्री पकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एकल पालकांच्या मुला-मुलांनी व दिव्यांगांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्था श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ व अंबाजोगाई यांची निवड झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत ९३३ लाभार्थ्यांना ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी खात्यात जमा करण्यात आला. आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे व सहाय्यक संस्थाच्...

सलग ५ वेळेस राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धा जिंकणारी संपूर्ण देशातील एकमेव अकॅडमी

Image
  👇 ही निळ्या रंगाची लिंक ओपन करा. https://maps.app.goo.gl/qZiB8bTqW1y6AddaA?g_st=awb https://www.facebook.com/share/1BuHTGcScB/ 👆 वर दिलेल्या लिंक ओपन करा.  ♦️ ॥ सुंदर हस्ताक्षर हाच सुंदर व्यक्तिमत्त्वाचा खरा दागिना ॥ 🎯 पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ लहानपणी मुलांवर अनेक संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे अक्षर संस्कार. चित्र, गायन, नृत्य इत्यादी कलेप्रमाणे हस्ताक्षर चांगले काढता येणे ही सुद्धा एक कलाच आहे. मानवाचे अंतर्मन दाखविणारा हा आरसा आहे. आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या मनावर प्रभाव पाडणारे हे एक तंत्र आहे. सुंदर हस्ताक्षर आपल्या जवळ टिकणारे एक भूषण आहे. दुसऱ्याच्या मनात प्रेम व आदरभाव निर्माण करणारी ही साधना आहे. सुंदर, वळणदार, पाहता क्षणी प्रसन्न वाटावे या सारखे दुसरे अक्षरसुख नाही. पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस मागील १० वर्षांपासून अंबाजोगाई शहरात निरंतरपणे चालू असून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले आहे. ● पार्थ अकॅडमी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात आमूलाग्र बदल करून त्यांचे ...