काव्यसिंधू : शांतीदूत
----------० शांतीदूत ०-------------------
(लहान बंधू विनोदजी रापतवार यांच्यासाठी मोठे बंधू राजेंद्र रापतवार यांचे सदिच्छा काव्य)
सहजपणे हो म्हणण्याने अवघड काम ही होऊन जातं.
सकारार्थी वायब्रेशन्सने यशाचं रहस्य उमलत राहतं.
न कळणारी भाषा, शब्दांकन, हास्यानंही उमजून जातं.
हसत जगणं हास्यात ठेवणं जगालाही जवळ आणतं.
आदर ठेवून गोड बोलणं माणसं जोडण्यास कामी येतं.
शब्दांना स्नेहात जुळवून माणुसकी जुळवणं शक्य होतं.
आपल्याच रक्ताच्या नात्यानं वात्सल्यात मन रमत जातं.
अन, प्रेम जिव्हाळा स्नेहाने रक्तापलीकडच नातं वाढतं.
परधर्म, पंथ, सहिषाणुतेने एकात्मतेच दर्शन घडतं.
भारत मातेचं हेच देणं शांतीदूताचा संदेश देतं.
~ © राजेंद्र नरहरराव रापतवार
साहित्यिक अंबाजोगाई.
मोबाईल क्रमांक : 9850986765
Comments
Post a Comment