कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने २५ व २६ मे रोजी उंदरी येथे खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम ; पुरस्कार वितरण, शेतकरी मेळाव्याचे आयोजन



कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणचा उपक्रम

२५ व २६ मे रोजी उंदरी येथे खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम ; पुरस्कार वितरण, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

======================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नांवे असलेल्या स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने रविवार, दिनांक २५ व सोमवार, दिनांक २६ मे २०२५ रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे विविध उपक्रम तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच 'खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम' ही होणार आहे. या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे-पाटील आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

येथील कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थीप्रिय दिवंगत सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार, दिनांक २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटाला उंदरी (ता.केज) येथे 'खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ऍड.राजेसाहेब देशमुख (माजी अध्यक्ष, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई.) आणि उ‌द्घाटक म्हणून अविनाश पाठक (भाप्रसे) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, मुंबई हे असणार आहेत. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे (ख्यातनाम गांधीवादी विचारवंत तथा इतिहास अभ्यासक, लातूर.), आणि प्रा.अरूण गुट्टे (विस्तार कृषि विद्यावेत्ता, अंबाजोगाई.) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच २६ मे सोमवार रोजी सकाळी ठिक ९.४० ते १०.०५ या वेळेत वृक्ष पुजन व संवर्धन करण्यात येवून सकाळी १० वाजता नियोजित कार्यक्रमास सुरूवात होईल. उंदरी (ता.केज) येथील 'कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती भवन' येथे दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा देखिल आयोजित करण्यात आला आहे. या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन रमेशराव आडसकर (चेअरमन, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना.लि.अंबाजोगाई) यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा (केज विधानसभा मतदारसंघ,जि.बीड) या असणार आहेत. तर यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नागोराव पवार (माजी संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) आणि प्रकाश देशमुख (विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या ११ मान्यवरांना “कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती पुरस्कार" तर अन्य ४ जणांना अनुक्रमे स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे-पाटील व स्व.सौ.राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार प्राप्त मान्यवरांत अनिकेत द्वारकादास लोहिया, अबाजोगाई (सामाजिक सेवा पुरस्कार-२०२४), दत्ताभाऊ शंकरराव बारगजे, बीड (सामाजिक सेवा पुरस्कार-२०२५), सय्यद रहेमान चाॅंद पाशा, लातूर (भक्त पुंडलिक पुरस्कार-२०२४), डॉ.संजय शिवराम पवार, ता.कंधार जि.नांदेड (भक्त पुंडलिक पुरस्कार-२०२५), विनोद नरहरराव रापतवार, नागपूर (आदर्श बंधू भरत पुरस्कार-२०२४), महावीर साहेबराव मस्के पाटील, ता.वडवणी जि.बीड (आदर्श बंधू भरत पुरस्कार-२०२५), डॉ.विनोद विजयकुमार चव्हाण, ता.जि.लातूर (पत्रकारिता पुरस्कार-२०२४), प्रा.नानासाहेब निवृत्तीराव गाठाळ (पत्रकारिता पुरस्कार-२०२५), अजीज खुद्दूस सय्यद, ता.जि.लातूर (सद्भावना पुरस्कार-२०२४), सौ.प्रतिभाताई जयंतराव वानखडे, ता.जि.अमरावती (सद्भावना पुरस्कार-२०२५), डॉ.रामधन‌ अंबादास ठोंबरे (उंदरी ग्रामभूषण पुरस्कार-२०२५) तसेच स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पांडुरंग साहेबराव आवाड, ता.कळंब,जि.धाराशिव (कुशल कारभारी किसान पुरस्कार-२०२४) आणि रेवणसिध्द भागवत लामतुरे, ता.जि.धाराशिव (कुशल कारभारी किसान पुरस्कार-२०२५) स्व.सौ.राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ.शोभा शिवाजी खोगरे, अंबाजोगाई (कुशल कारभारीन किसान पुरस्कार-२०२४) आणि सौ.द्वारका प्रतापराव काळे, ता.पुर्णा,जि.परभणी (कुशल कारभारीन किसान पुरस्कार-२०२५) यांचा समावेश आहे. २५ व २६ मे या दोन्ही दिवशी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांसाठी केज, अंबाजोगाई तालुका आणि लातूर तसेच बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे-पाटील आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उंदरी (ता.केज) येथील समस्त गांवकरी उंदरी, माजी कृषी विद्यार्थी संघ व मित्र परिवार, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी आदिंनी पुढाकार घेतला आहे.

====================================


Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)