अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील - चेअरमन रमेशराव आडसकर

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील - चेअरमन रमेशराव आडसकर अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अबांसाखरची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या प्रांगणात सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाली. यावेळी बोलताना चेअरमन रमेशराव आडसकर यांनी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने पुढाकार घेतला आहे. हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी अहवाल वर्षातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अहवालाचे वाचन करण्यात आले, त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. यावेळी सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून बोलताना चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या ४७ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेस सर्वजण उपस्थित राहिलात या बद्दल संचालक मंडळाचे वतीने मी सर्वांचे हार्दीक स्वागत करून दिनांक १...