महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती : २९ सप्टेंबर रोजी मान्यवरांना पुरस्कार ; सुप्रसिद्ध गायक मनोजराजा गोसावी आणि गायिका धम्मदिक्षा वाहुळे यांचा भीम गीत गायन कार्यक्रम

महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती : २९ सप्टेंबर रोजी मान्यवरांना पुरस्कार ; सुप्रसिद्ध गायक मनोजराजा गोसावी आणि गायिका धम्मदिक्षा वाहुळे यांचा भीमगीत गायन कार्यक्रम

लोकशाहीर वामनदादा कर्डक कला अकादमीचा पुढाकार

=================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

येथील लोकशाहीर वामनदादा कर्डक कला अकादमी, अंबाजोगाई यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त वामनदादा यांच्या सहवासातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार आणि यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवी, गायक मनोजराजा गोसावी आणि धम्मदिक्षा वाहुळे यांचा भीमगीत गायन कार्यक्रम रविवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद कार्यालय परिसर, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांचे प्रवर्तनवादी विचार गीत, संगीत, गायनाच्या माध्यमातून ज्यांनी 'जिथे गांव, तिथे भीमाचे नांव पोहोंचवणारा, 'भीमसा कौन बडा है, बताओ इस धर्तीपर, कोई नहीं. एक नया आंबेडकर पैदा हो' यासाठी आयुष्यभर भीमाईचे गीत गात संपूर्ण जीवन जगलेले वामनदादा कर्डक यांचा दिर्घ सहवास अंबाजोगाईच्या भूमीला लाभला. अशा या महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त दादांनीच गायिलेल्या बुद्ध-प्रबुद्ध गीतांच्या दैदीप्यमान कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ललिताताई घोडके (वामनदादा कर्डक यांची लेक) या आहेत. तर यावेळी डॉ.प्रो.एम.डी.इंगोले (आंबेडकरवादी हिंदी लेखक व वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे अभ्यासक), प्रा.दिपक जमदाडे (बुलढाणा) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी मनोजराजा गोसावी (यवतमाळ) यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव घोडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०२४ सालचा लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार आणि प्रा.डॉ.सागर जाधव, यवतमाळ (संपादक व प्रकाशक, वामनदादा कर्डक समग्र वाङमय खंड १ ते १६) यांना आयु.देवदास भाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०२४ सालचा लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.तसेच प्रा गौतम गायकवाड लिखित "लोककवी वामनदादा कर्डक यांच्या गीतातील महान स्ञी पुरुष व्यक्तिरेखा" या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एक व्यापक स्वरूपातील समिती गठीत करण्यात आलेली आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती व आवाहन करून जयंती उत्सव समितीचे प्रमुख गायक राहुल सुरवसे, भीमशाहीर गौतम सरवदे, गायक महादेव भालेराव, आयोजन समितीचे प्रा.गौतम गायकवाड, प्रा.रमेश सरवदे, प्रा.राजकुमार ठोके, तालमणी प्रकाश बोरगावकर, अकादमीचे अध्यक्ष शंकर लोंढे, महादेव माने, रमाकांत वाव्हळे, राजेंद्र सरकटे, डि.एन.घोबाळे, विकास एडके, गायक बळीराम उपाडे, शेषेराव काशिकर, अमोल तरकसे, विशाल गायकवाड, विश्वनाथ सिरसाट, स्वितम इंगळे, सिध्दार्थ तरकसे आणि सल्लागार समितीचे डि.एन.आचार्य, ऍड.अनंतराव जगतकर, ऍड.शाम तांगडे, प्रा.एस.के.जोगदंड, चंद्रशेखर वडमारे, प्रा.डी.जी.धाकडे, भारत सातपुते, सुचिताताई सोनवणे, जगनबापु सरवदे, प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, प्रा.डॉ.सा.द.सोनसळे, डॉ.राजेश इंगोले, डॉ.राहूल धाकडे, दत्ता सरवदे, सुभाष ताटे, डॉ.किर्तीराज लोणारे, प्रा.बी.एस.बनसोडे, बी.बी.धन्वे, प्रा.पी.वाय.फुलवरे, लंकेश वैद्य, ऍड.संदिप थोरात, डि.के.कांबळे, एम.एम.गायकवाड, महादेव आदमाने, संतोष शिनगारे, विष्णु रोडे, नागेश जोंधळे, माधव काळे, कुमार काळे, निवृत्ती कांबळे, एकनाथ सुरवसे, महादेव वाव्हळे, आकाश वेडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला आहे.

==============================



Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)