स्व.भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ख्यातनाम नाटककार, नट, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा उपक्रम ; स्व.भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ख्यातनाम नाटककार, नट, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर

===================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी  समाजकारण, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, नाटक, सिनेमा आदी क्षेत्रात उतुंग कार्य केलेल्या एका मान्यवरास स्व.भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा १२ वा पुरस्कार  संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पद्मश्री सतीश आळेकर (पुणे) यांना दिला जाणार आहे. 

पद्मश्री सतीश आळेकर हे गेली पन्नास वर्षांपेक्षा आधिक काळ नाटककार म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्याचबरोबर सिनेमा पटकथा लेखन त्यांनी केलेलं आहे. नाटक व सिनेमात त्यांनी अभिनयाबरोबरच उत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांचे कार्य रसिकांच्या मनामनात आहे. जीवरसायन शास्त्रात त्यांनी पदवी प्राप्त केली आणि अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर ते नाटक लिहिणे आणि नाट्य चळवळ गतिमान करण्यात यशस्वी झाले. त्यांची मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, शनवार रविवार, पिढीजात आदी नाटके प्रसिद्ध व लोकाभिमुख झाली. झुलता पूल, सामना आदी एकांकिका या सर्वोत्तम लोकप्रिय झाल्या होत्या. जैत रे जैत या मराठी सिनेमाचे पटकथा लेखन त्यांनी केले. अनेक नाटकाचे दिग्दर्शन व अभिनय पण त्यांनी केला आहे. यशवंतराव चव्हाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आक्रित, उंबरठा आदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. अंबाजोगाई येथे त्यांच्या अनेक नाटकांचे प्रयोग झाले होते. त्यांना या कार्यासाठी  राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे अनेक  नामांकित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यात प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या नाट्य व सिनेक्षेत्रातील हे कार्य पाहता या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना न्या.अंबादास जोशी (माजी न्यायमूर्ती हायकोर्ट व लोकायुक्त गोवा राज्य) यांच्या हस्ते व नाट्य कलावंत चंद्रकांत काळे यांच्या विशेष उपस्थितीत देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख पंचेविस हजार रूपये असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार, यशवंतराव गडाख - पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना.धों.महानोर, माजी आमदार रामदास फुटाणे, पं.नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, माजी आमदार उल्हासदादा पवार, प्राचार्य रा.रं.बोराडे व पद्मश्री डॉ.यु.म.पठाण व प्रा.भास्कर चंदनशिव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. या वर्षीचा बारावा पुरस्कार सतीश आळेकर यांना शनिवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी अंबाजोगाई येथे प्रदान करण्यात येईल. अशी माहिती दगडू लोमटे यांनी दिली आहे.

===================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)