अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी बंद पाळणार - ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांचा इशारा

बर्दापूर येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम १४ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करा

अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी बंद पाळणार - ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांचा इशारा

=================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

तालुक्यातील मौजे बर्दापूर येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम १४ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करा, अन्यथा १५ ऑक्टोबर २०२४ रोजी अंबाजोगाई शहर व तालुक्यात बंद पाळण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी दिला आहे. तसेच आयोजित बैठकीत केदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे स्मारकाच्या रखडलेल्या कामाबाबत आक्षेप नोंदवून जाब विचारला. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने गुरूवारी एक निवेदन देण्यात आले.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी तालुक्यातील मौजे बर्दापूर येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांची मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेतली. रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याबाबत सांगितले. त्यानंतर बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता यांनी स्वतः बर्दापूर स्मारकाला भेट देवून सदर कामाचे कंत्राटदार, स्मारक समिती आणि ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून काम १४ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करणार असे आश्वासन दिले. मौजे बर्दापूर येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी ६ महिन्यांमध्ये नविन पुतळा बसवुन स्मारक पुर्ण करू असे आश्वासन आंदोलकांना त्यावेळी दिले होते. ५ वर्षे झाले तरी अद्यापपर्यंत स्मारकाचे काम अर्धवटच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई कार्यकारी अभियंता यांच्या निष्क्रीयेतेमुळे सदरील काम रखडलेले आहे. आश्वासनानुसार वेळेत काम पूर्ण केले नाही. तर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी अंबाजोगाई शहर व तालुक्यात बंद पाळण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनाच्या प्रती माहितीस्तव १) कार्यकारी अभियता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई., २) पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड, मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे, महिला आघाडी बीड जिल्हाध्यक्षा मिनाताई लोंढे, युवा जिल्हाध्यक्ष नितीन गोदाम, जिल्हा सरचिटणीस विजयबाबा कांबळे, तालुकाध्यक्ष बादल तरकसे, युवक तालुकाध्यक्ष शैलेंद्र बनसोडे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेखाताई मस्के, तालुका सचिव प्रकाशआबा गंडले, शहराध्यक्ष भैय्यासाहेब सोनकांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

स्मारकाचे काम रखडल्याने आंबेडकरी समाज नाराज :

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कुठल्या ना कुठल्या पध्दतीने अवमान करण्याचे धोरण हे शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजप यांच्या महायुती सरकारकडून सातत्याने होत आहे. पालकमंत्री ना.मुंडे हे विकासाच्या मोठ-मोठ्या गप्पा मारतात. परंतु, त्यांच्याच परळी विधानसभा मतदारसंघातील महामानव डॉ.आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम ते पुर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाचा रोष त्यांच्यावर आहे.

- अक्षय भुंबे (मराठवाडा युवक अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना)

===============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)