संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे यांची निवड

संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे यांची निवड जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन ================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) येथील संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील डिघोळ आंबा ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब सोनवणे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण शेप व प्रशांत शेप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदर निवडींचे मित्र परिवारासह सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. दरम्यान येत्या ६ ऑगस्ट रोजी जयंती उत्सव सोहळा असून त्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सोनवणे यांनी दिली आहे. संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सुप्रसिद्ध किर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचे भव्य किर्तन ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आद्यकवी मुकूंदराज सभागृहात होणार आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांची जयंती असून जिल्हाभरात त्या अनुषंगाने उत्सव साजरा करण्याची तयारी सर्वत्र सुरू झाली....