जीवनात यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता - विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांचे प्रतिपादन

जीवनात यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता - विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांचे प्रतिपादन

अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या पुढाकाराने आयोजित सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व परिवर्तन कार्यशाळेस विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

===================================

लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

आपल्या दैनंदिन व व्यावहारिक जीवनात इतर लोकांशी संवाद साधताना व त्यांच्या समवेत काम करताना आपण स्वतःला किती चांगल्या प्रकारे सादर करू शकतो व त्या परिस्थितीला हाताळू शकतो हे आपल्यातील सॉफ्ट स्किल्स अर्थातच मृदु कौशल्यांवर अवलंबून असते. आपणांस वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळवायचे असेल तर स्वतःमध्ये सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्यांचा विकास करण्यासाठी ची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा जिमखाना विभाग, विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने आयोजित सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व परिवर्तन या एक दिवसीय कार्यशाळेत केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख पाहुणे कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी, उदगीरचे प्राचार्य डॉ.अंगद सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक आई सेंटर प्रोचे संचालक तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे, प्रा.राहुल सुरवसे व माजी पोलीस उपनिरीक्षक विष्णू रोडे हे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पदवी व पदव्युत्तर पदवीतील विद्यार्थी व प्राध्यापकांशी सुसंवाद साधताना विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की सॉफ्ट स्किल्स हे लोक कौशल्य म्हणून ओळखले जातात. साधारणपणे लोकांना आपला इंटेलिजंट कोशण्ट म्हणजेच बुद्ध्यांक हा उघडपणे दिसून येतो ज्यामध्ये तुमचे हार्ड स्किल्स म्हणजेच तुम्ही निवडलेली पदवी, विषय व त्यातील निपुणता जे की, तुमचे ज्ञान व कौशल्य दर्शविते. तर साॅफ्ट स्किल्स हे आपणास मित्र- मैत्रिणी तसेच सहकाऱ्यांशी संवाद साधतेवेळी चांगले नातेसंबंध, विश्वास आणि विश्वासार्हता निर्माण करणे, नवीन नेटवर्क प्रस्थापित करणे तसेच संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असून याचा फायदा आपणास नोकरी मिळवण्यासाठी तसेच नोकरी मध्ये बढती मिळविण्यासाठी देखील अदृश्यरित्या होऊ लागतो. या कार्यशाळेमध्ये आपल्या विशिष्ट शैलीने द डायनॅमिक कम्युनिकेटर या बेस्ट सेलिंग पुस्तकाचे विश्वविक्रमवीर लेखक सर नागेश जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांनांही सक्रिय सहभागी करून घेत न्यूनगंड बाजूला सारत त्यांच्यातील सुप्त गुण व संभाषण कौशल्यांसाठी स्टेजवर आमंत्रित करत सादरीकरणासाठी प्रोत्साहित केले. तसेच हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनात असे सांगितले आहे की तुमच्या कार्यस्थळी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी 85 टक्के हे सॉफ्ट स्किल्स तर 15 टक्के हार्ड स्किल्स असे समीकरण आहे. यावेळी विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी महाविद्यालयाचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे तसेच दूरदृष्टी लाभलेले प्रभावी व्यक्तिमत्व असलेले अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शैक्षणिक अभ्यासाबरोबरच त्यांच्यात सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व बदलासाठीच्या कार्यशाळेचे आयोजन करून खऱ्या अर्थाने त्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान जागृत होऊन त्यांचा स्वतःकडे व इतरांकडेही पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होणार असल्याची खात्री देत व देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी अशा कार्यशाळेच्या माध्यमातून मोठी संधी निर्माण करून देत प्रात्यक्षरीत्या त्यांच्यातील 'बेस्ट ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटी' रूजविण्याचे मोलाचे कार्य केल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.अंगद सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला स्वीकारावे, स्वतःचा अभिमान बाळगावा, संयम व आत्मविश्वास ठेवावा असे मत व्यक्त केले. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.दिनेशसिंह चौहान यांनी सांगितले कि यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रमवृत्ती, अभ्यासूवृत्ती, सातत्य, प्रयत्न, ध्येय यांचबरोबर व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, यशस्वी होण्याकरीता शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार हि व्यक्तिमत्व विकासाची चतु:सूत्री आहे. व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवू शकतात. ध्येय प्राप्ती व प्रगती करण्यासाठी विद्यार्थींनी कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहेत असेही डॉ. ठोंबरे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेचा अभिप्राय देताना पदवीतील सुमित तारक व पदव्युत्तर पदवीतील शिक्षण घेत असलेली वैष्णवी धांडगे यांनी स्वतःला ओळखून व्यक्तिमत्व परिवर्तनासाठी सर नागेश जोंधळे यांनी आजच्या कार्यशाळेत अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून देखील यश मिळवता येऊ शकते व लोकल ते ग्लोबलचा प्रवास करण्यासाठीची ऊर्जा मिळाली असल्याचा विश्वास व्यक्त केला तसेच डॉ.योगेश भगत यांनी सांगितले की करिअरच्या विविध वळणावरती देखील या कार्यशाळेचा उपयोग सहजपणे घेता येऊन आपल्याला पुढील पदोन्नतीसाठी या कार्यशाळेचा चा उपयोग होणार असल्याचे नमूद केले. जिमखाना उपाध्यक्ष डॉ.अच्युत भरोसे यांनी कार्यशाळेेचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन कोरडे व समृध्दी भरात्पे या विद्यार्थ्यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.राहुल चव्हाण यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सारिका भालेराव, डॉ.भास्करराव आगलावे, डॉ.महेंद्र दुधारे, डॉ.रमेश ढवळे, डॉ.विद्या हिंगे, मनीषा बगाडे, सुरेखा आंबटवाड, अश्विनी गरड, वीरभद्र दुरुगकर, संगीता सोरेकर उपस्थित होते. 

===============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)