एक विद्यार्थी 5 वृक्ष संकल्पना आवश्यक - डॉ.बाबासाहेब ठोंबरे
कृषि महाविद्यालयात कृषि दिन वृक्ष दिंडी काढून साजरा
===============================
लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
दि.1 जुलै सोमवार रोजी कृषि महाविद्यालय, लातूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना व समाजिक वनीकरण विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनपर डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी ५ वृक्ष ही संकल्पना आवश्यक आहे. यात एक पेड मॉं के नाम, एक पेड पिता के नाम, एक पेड गुरू के नाम, एक पेड दोस्त के नाम और एक पेड खुद के नाम हे उपक्रम राबविण्यात येत आहे. वृक्षदिंडीचा 16 वा व वट वृक्षाचा 24 वा वाढदिवस 600 विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या उपस्थितीत साजरा झाला. 3 लक्ष वृक्षांचे संवर्धन करण्यात येत आहे. यातून 100 दशलक्ष टन ऑक्सिजनची प्रतिदिन निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच याप्रसंगी परिसरामध्ये प्रतिनिधिक स्वरूपात वृक्ष लागवड करण्यात आली तसेच गाजर गवत निर्मूलन, प्लास्टिक निर्मूलन व कचरामुक्ती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमास समाजिक वनीकरण विभागाचे सचिन माने, शिवानंद कोळी, विवेक नांगरवाडे, महादेवी गिरी, संघप्रिया काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.दिनेशसिंह चौहान यांनी केली व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.अनिलकुमार कांबळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.व्यंकट जगताप यांनी मानले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.संतोष कांबळे, डॉ.अनंत शिंदे, डॉ.विजय भामरे, डॉ.पद्माकर वाडीकर, डॉ.राजेश शेळके, डॉ.दयानंद मोरे, डॉ.नितीन तांबोळी, डॉ.विनोद शिंदे, डॉ.सुनिता मगर, डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ.प्रभाकर आडसूळ, डॉ.शिवशंकर पोले, डॉ.संघर्ष श्रृंगारे, प्रा.भगवान कांबळे, डॉ.अजित पुरी, मायादेवी भिकाने, मीना साठे व राहुलदेव भवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
======================================
Comments
Post a Comment