बीड जिल्ह्यातील स्मार्ट प्रिपेड मीटरचे टेंडर रद्द करा - समाजवादी पार्टीचे प्रदेशसचिव ऍड.शिवाजी कांबळे

बीड जिल्ह्यातील स्मार्ट प्रिपेड मीटरचे टेंडर रद्द करा - समाजवादी पार्टीचे प्रदेशसचिव ऍड.शिवाजी कांबळे

समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

बीड जिल्ह्यातील स्मार्ट प्रिपेड मीटरचे टेंडर रद्द करावे अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशसचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत मंगळवार, दिनांक २ जुलै २०२४ रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

प्रीपेड मीटर्स हटाव, प्रीपेड योजना रद्द करा, प्रीपेड मीटर्स घेणार नाही, केवळ घोषणा आणि आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारचा आणि कंपनीचा धिक्कार असो, प्रीपेड मीटर्सचा कायदा, अदानीचा फायदा अशा विविध घोषणा सुरूवातीस देण्यात आल्या त्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रदेशसचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यातील स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्याचे टेंडर रद्द करण्यात येवून महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांचे सध्याचे मीटर काढून विनाकरण वीज ग्राहकांची लुट करण्यात येत आहे. सध्याचे मीटर हे चांगले असून छोट्या कुंटुबातील शेतकरी, मजुर या लोकांना स्मार्ट प्रिपेड मीटरची किंमत ही परवडणारी नाही. विनाकरण कंपनीच्या फायद्यासाठी सदर मीटर बदलण्यात येत आहेत. तरीही सदर स्मार्ट मीटर बसविण्यात येवू नयेत. अन्यथा समाजवादी पार्टीचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. तसेच वीज ग्राहकांना बिले वेळेवर मिळत नाहीत. तरी ते वेळेत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदनाची प्रत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु असिम आझमी तसेच महावितरणच्या विभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांना देण्यात आली आहे. सदरील निवेदनावर समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे, भाऊसाहेब डिघोळे, अहमद चाॅंद शेख, राजेश परदेशी, शेख शौकत, शेख शाकेर आणि शेख जावेद आदींसह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रीपेड मीटर्स रद्द करा :

महावितरण कंपनीने आणि राज्य सरकारने प्रीपेड मीटर्स लावण्याची योजना रद्द करावी. ३०० युनिटच्या आत वीज वापर असणाऱ्या सर्व म्हणजे दोन कोटी पाच लाख ग्राहकांचे मीटर्स बदलू नयेत. त्यांचे जे मीटर्स आहेत तेच कायम ठेवावेत आणि प्रीपेड मीटरच्या खर्चाचा कोणताही भार ग्राहकांवर लावू नये, या मागणीसाठी आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. प्रीपेड मीटर्स योजना ही केवळ घोषणा असून कोणताही अधिकृत निर्णय कंपनीने अथवा महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे ही योजना त्वरित मागे घ्यावी आणि राज्यातील दोन कोटींहून अधिक सर्वसामान्य गरीब वीज ग्राहकांना या बोजातून मुक्त करावे अशी मागणी आम्ही करीत आहोत.

- ऍड.शिवाजी कांबळे

(प्रदेशसचिव, समाजवादी पार्टी.)

=============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)