जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध - आ.नमिताताई मुंदडा

जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध - आ.नमिताताई मुंदडा सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश ================================ अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) केज विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या अनेक विकास कामांनी प्रभावित होऊन आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे भारतीय जनता पक्षात सहर्ष स्वागत केले. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून केज विधानसभा मतदारसंघात न भुतो न भविष्यती एवढा विकास निधी उपलब्ध झाला. या निधीतून होत असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन आणि ज्येष्ठ नेते नंद...