जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध - आ.नमिताताई मुंदडा
जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध - आ.नमिताताई मुंदडा
सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश
================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
केज विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या अनेक विकास कामांनी प्रभावित होऊन आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे भारतीय जनता पक्षात सहर्ष स्वागत केले.
देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून केज विधानसभा मतदारसंघात न भुतो न भविष्यती एवढा विकास निधी उपलब्ध झाला. या निधीतून होत असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांचे भारतीय जनता पक्षात सहर्ष स्वागत केले. या प्रसंगी बोलताना आमदार सौ.मुंदडा म्हणाल्या की, केज विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या सर्वांगिण व चौफेर विकासामुळे सामान्य माणूस ही आज भाजपाशी जोडला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून भाजपाला ताकद आणि मुंदडा कुटुंबियांना भक्कम साथ देणारा सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात मोठा झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे व आज ही करीत आहोत. कारण, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तरूणांना जनसेवा करता येते. आज काकाजी हे सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्या सारख्या असंख्य युवकांना राजकारणात योग्य ते मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून सर्वांना सोबत घेऊन समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरात युवा नेतृत्व निर्माण करण्याचे काम सुरू आहे असे आ.सौ.मुंदडा यांनी सांगितले. अंबाजोगाई शहरातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्यासह शहरातील त्यांच्या अनेक सहकारी, युवक, मित्रांनी आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात गुरूवार, दिनांक २१ मार्च रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. इम्रान पठाण हे समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आमदार सौ.नमिताताई, ज्येष्ठ नेते काकाजी, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी, माजी नगरसेवक संजय गंभीरे यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक वाजेदभाई खतीब, माजी नगरसेवक बाला पाथरकर, माजी नगरसेवक ताहेरभाई, बबलू सिद्दीकी, राणा चव्हाण, ऍड.अरविंद मोटेगावकर, शैलेष स्वामी, सुजात भाई, बळीराम चोपने, अनंत अरसुडे, अमोल पवार, आप्पा लामतुरे, मयुर रणखांब, कडबाने, कापसे, अतुल कसबे, प्रताप देवकर, अक्षय भुमकर, राठोड आदींसह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून इम्रान पठाण यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले. पठाण यांच्यामुळे अंबाजोगाई शहरात भाजपाची ताकद आणखीन वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः आता सदर बाजार या भागात भाजपाचे संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे ही पुजारी यांनी नमूद केले. आपल्या भाजपा प्रवेशाबाबत बोलताना इम्रान पठाण म्हणाले की, मला घरातूनच समाजसेवेचा वारसा मिळाला आहे. माझे वडील वीस वर्षे अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगरसेवक होते. दिवंगत लोकनेत्या डॉ.विमलताई मुंदडा यांचे अभ्यासू, विकासप्रिय नेतृत्व आम्ही जवळून पाहिले आहे. मागील दोन ते अडीच वर्षांत विद्यमान आमदार सौ.नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते काकाजी व युवा नेते अक्षयभैय्या यांनी अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला भरीव निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला आहे. आज संपूर्ण केज विधानसभा मतदारसंघासह अंबाजोगाई शहरात विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मुंदडा परिवार २४ तास जनसेवेसाठी उपलब्ध आहे. मुंदडा कुटुंबिय प्रत्येकाच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होतात, मतदारसंघातील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांना भक्कम आधार व ताकद देतात, अल्पसंख्यांक तसेच वंचित बहुजन समाजाला पाठबळ व योग्य त्या ठिकाणी राजकीय संधी उपलब्ध करून देण्याचे काम फक्त ज्येष्ठ नेते काकाजी व युवा नेते अक्षयभैय्या हेच करीत आहेत. त्यामुळे माझा मित्र परिवार, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य लोकांसाठी आपण आज काकाजी व भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाला अंबाजोगाई शहरात अधिक मजबूत करणार आहोत. विशेषतः सदर बाजार प्रभागामध्ये भाजपाची ताकद आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. अंबाजोगाई शहराला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपा हाच सक्षम पर्याय आहे, सर्व समाज घटकांचा विकास झाला पाहिजे, हा सर्वसमावेशक विचार घेऊन भाजपा पक्ष उत्तम कार्य करीत आहे, असे इम्रान पठाण म्हणाले. तर अंबाजोगाई शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण यांच्यासह त्यांच्या माजेद शेख, अकबर पठाण, सय्यद रशिद, फेरोज पठाण, शेख रशिद, इस्माईल पठाण यांच्यासह अंबाजोगाई शहरातील अनेक सहकारी, युवकांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले. तर प्रास्ताविक करताना माजी नगरसेवक संजय गंभीरे यांनी सांगितले की, केज विधानसभा मतदारसंघातील युवकांच्या मदतीसाठी व विकासासाठी भाजपाच्या माध्यमातून मुंदडा कुटुंबिय सदैव प्रयत्नशील आहे. काकाजी व अक्षयभैय्या युवकांना योग्य मार्गदर्शन करतात. इम्रान पठाण यांनी यापूर्वी गरजू लोकांना ब्लँकेट वाटप केले, स्वाराती रूग्णालयात रूग्ण व नातेवाईकांना मदत केली, गोर-गरीब कुटूंबांना रेशनकार्ड, स्वस्त धान्य मिळवून दिले, आयुष्यमान कार्ड, तहसील, दवाखाना आणि नगरपरिषद, गटशिक्षण कार्यालय व आवश्यक तेथे जाऊन सर्वसामान्य नागरिकांची कामे करून दिली आहेत, सदर बाजार प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे, रस्ते, नाली, वीज पुरवठा यासाठी पाठपुरावा करणे, कोविड काळात गरजू कुटुंबांना धान्य व मदत मिळवून दिली आहे, बेघर लोकांना मदत केली, नागरिकांना विविध शासकीय योजना त्यांना मिळवून दिला, नवमतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, दुष्काळात गुरांना चारा व पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच नागरिकांसाठी पाणपोई सुरू केली. यासह अनेक लोकहिताची कामे इम्रान पठाण यांनी केली आहेत. यामुळे पठाण यांच्या सारख्या तरूणांनी भाजपात प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. असे माजी नगरसेवक गंभीरे यांनी सांगितले. पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपचे विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई, केज शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===============================
Comments
Post a Comment