अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी ऍड.अरविंद मोटेगावकर यांची निवड
मोटेगावकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत
================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड.अरविंद मोटेगावकर यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र त्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा, जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी नुकतेच बासर (तेलंगणा राज्य) येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात दिले आहे. ऍड.मोटेगावकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.
बासर (तेलंगणा राज्य) येथे नुकतेच राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात देशभरातून संघटनेचे शेकडो पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण (बीड) यांच्या हस्ते ऍड.अरविंद जीवनराव मोटेगावकर यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या बीड (पूर्व) विभागातील अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शराफत मीर खान तय्यब मीर खान (जहांगीर भाई पठाण), सामाजिक कार्यकर्ते राजेश वाव्हळे, अमितभैय्या जाजू आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या निवडीबद्दल आभार मानून यापुढे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड जिल्ह्यातील समितीच्या सर्व ज्येष्ठ व युवा पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यात प्रभावीपणे कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष ऍड.अरविंद मोटेगावकर यांनी सांगितले. ऍड.मोटेगावकर मागील १२ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी जिवा सेना संघटनेचे मराठावडा अध्यक्ष, नाभिक समाजाचे मराठावडा सचिव आणि ओबीसी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष (अंबाजोगाई) ही मानाची पदे भूषविली आहेत. एक कुशल संघटक म्हणून ते प्रभावीपणे कार्य करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केला आहे. समाजसेवेचे बाळकडू त्यांना लहानपणापासून घरातूनच वारसा रूपाने मिळाले आहे. सामाजिक बांधिलकी मानून ऍड.अरविंद मोटेगावकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत हे विशेष होय. एक अभ्यासू, अनुभवी आणि कुशल संघटक म्हणून ऍड.मोटेगावकर यांची संपूर्ण मराठवाड्यात सर्वदूर ओळख आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी ऍड.मोटेगावकर यांच्या करण्यात आलेल्या निवडीचे समाजाच्या सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
================================
Comments
Post a Comment