राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगुलपणाचा आविष्कार विकसित होतो - प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे

तरूणांनी सत्याचा मार्ग अनुसरावा - प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरास महापूर येथे प्रारंभ      ================================            लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महविद्यालय, लातूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा प्रारंभ मौजे महापूर (ता. जि.लातूर) येथे बुधवार, दि.२० मार्च २०२४ रोजी भव्य उद्घाटन कार्यक्रमाने झाला.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे तर उद्घाटक म्हणून ख्यातनाम इतिहास अभ्यासक प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.रणजित चव्हाण, डॉ.दिनेशसिंह चौहान, भागवत भोसले व डॉ. प्रशांत करंजीकर हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व डॉ.वसंतराव नाईक यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन झाले. सुश्राव्य स्वागत गीतानंतर उद्घाटन कार्यक्रमास सुरूवात झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर कुलगुरू प्रा.डॉ.इंद्र मणी यांच्या संकल्पनेतून तर संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), डॉ.उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, शिबिरातील सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्कृष्ट योगदान द्यावे. गावकऱ्यांच्या अडी - अडचणीस एकरूप होवून त्यांच्या अडचणी सोडविण्यास पुढाकार घ्यावा. आजचा युवक हा उद्याचा सशक्त नागरिक आहे, म्हणून तरूणांनी सत्याचा मार्ग अनुसरावा असे आवाहन केले. या उद्‌घाटन सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांनी युवकांना देशाच्या प्रगती व उन्नतीसाठी तरूण क‌सा असावा हे विषद करताना ते म्हणाले, समाजामधील वाईट घटनांना पाहून जो बेचैन व अस्वस्थ होत नाही, त्याला तरूण म्हणता येणार नाही. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक, संघटित, सामर्थ्यशील व रचनात्मक कार्याची गरज असते. त्यांनी तरूणांना देशहितासाठी प्रेरित करतांना ‘जो स्वतःसाठी जगतो तो संपलेला असतो’ असे प्रखर वक्तव्य केले. विद्यार्थ्यानी “मी माझे भविष्य घडवेल” असा दृष्टीकोन निर्माण करावा असे सांगून त्यांना प्रवाहाच्या विरूद्ध जाऊन नविन मार्ग शोधण्यास प्रेरित केले. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगुलपणाचा आविष्कार विकसित होतो, असेही ते म्हणाले. भागवत भोसले यांनी महापूर गावातील ग्रामस्थांनी विशेष शिबीराचा कृषि तंत्रज्ञानाबाबत लाभ घेण्यासाठी आवाहन केले तर डॉ.रणजित चव्हाण यांनी विदयार्थ्यांना भविष्यात कृषि सप्ताह, कृषि व्याख्यान व कृषि अभंग साजरे करण्यास प्रेरित करून प्रगत युगात जगत असताना ही गावाशी नाळ कायम जोडून काम करण्यास सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.अनिलकुमार कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन आदित्य गवळी यांनी केले तर दीप्ती झोडगे तर उपस्थितांचे आभार कविता वडजे हिने मानले. सिद्धी नलावडे व संजना वजीरे यांच्या सुश्राव्य स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमास डॉ.व्यंकट जगताप, डॉ.संतोष कांबळे, डॉ.राजेश शेळके, डॉ.नितीन तांबोळी, डॉ.दयानंद मोरे,डॉ.प्रभाकर आडसूळ, डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ.संघर्ष शृंगारे, डॉ.अजित पुरी, सुधीर सूर्यवंशी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.   

===============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)