ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखेच्या निवडणुकीत राजाभाऊ राठोड भरघोस मतांनी विजयी
मराठवाड्यासाठी अभिनंदनीय बाब ; ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखेच्या निवडणुकीत राजाभाऊ राठोड भरघोस मतांनी विजयी
==============================
माजलगाव (देविदास जाधव यांच्याकडून)
ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखेच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले.यामधे तालखेड (कुरण तांडा) येथील राजाभाऊ पापालाल राठोड हे भरघोस मतांनी विजयी होऊन अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
ट्रेंड नर्सेस असोसिएशन ही आशिया खंडातील सर्वात जुनी असोसिएशन आहे. 1908 मध्ये असोसिएशनची स्थापना झाली. दर चार वर्षांनी असोसिएशनची निवडणूक होते. आत्तापर्यंत महाराष्ट्रात अध्यक्ष हे बिनविरोध निवडून येत होते. पहिल्यांदाच म्हणजे 116 वर्षानंतर अध्यक्षपदासाठी विरोधक म्हणून राजाभाऊ राठोड उभे राहिले होते. दिनांक ७ मार्च रोजी महाराष्ट्र शाखेची निवडणूक झाली. यामध्ये अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण नर्सेस आनंद साजरा करीत आहे. मराठवाड्यातील एका छोट्याशा तांड्यातील व्यक्तीने या एवढ्या मोठ्या असोसिएशन मध्ये अध्यक्षपद भूषविणे ही मराठवाड्यासाठी गौरवाची बाब आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सुपुत्र आज महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदावरती विराजमान झाल्याबद्दल संपूर्ण मराठवाड्यातील नर्सेस आणि महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे. आत्तापर्यंत मराठवाड्यातील एकही व्यक्ती या पदावर विराजमान झालेली नाही. तो इतिहास राजाभाऊ राठोड यांनी घडवला आहे.त्याबद्दल सर्वस्तरांतून राजूभाऊ राठोड यांचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment