रक्षाबंधनासाठी वैदिक राख्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचा अभिनव उपक्रम

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांची माहिती ======================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) तालुक्यातील वरवटी येथील श्री संत भगवान बाबा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेने मागील काही वर्षांपासून रक्षाबंधनासाठी पर्यावरणपूरक व आकर्षक अशा वैदिक राख्या तयार केल्या आहेत. यातून पर्यावरण संवर्धन करण्याचा मौलिक संदेश ही देण्यात आला आहे. अशी माहिती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांनी दिली आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी व गो-सेवा गतीविधी, देवगिरी प्रांत यांच्या विधायक सूचनांप्रमाणे तसेच गो-शाळेतील गायींचे संगोपनासाठी गो-शाळा स्वावलंबी बनणे गरजेचे आहे. देश-देव अन् धर्मासाठी गो-आधारीत विविध जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करून गो-शाळा स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच विचाराला बळ देण्यासाठी मागील काही वर्षांपासून रक्षाबंधनासाठी पर्यावरणपूरक आणि आकर्षक अशा “वैदिक राख्या” तयार केल्या ...