राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकेच्या मनमानी कारभाराला लगाम लावा - अखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन
वतीने अशा बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार - जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांचा इशारा
======================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे
(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
बीड जिल्ह्यातील प्रामुख्याने अंबाजोगाई तालुक्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेच्या मनमानी कारभाराने
शेतकरी वर्ग, तसेच सर्वसामान्य नागरिक, नौकरदार वर्ग त्रस्त झाला आहे. त्यामुळे मनमानी कारभाराला लगाम लावावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी उपजिल्हाधिकारी यांना गुरूवार, दि.3 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक यांच्या मनमानी कारभारला शेतकरी वर्ग तसेच सामान्य नोकरदार ही वर्ग त्रस्त झालेला दिसत आहे. प्रमुख्याने आंबेजोगाई तालुक्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक व इतर शेतकर्यांचे संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान योजना तसेच शेतकर्यांचा विमा व अनुदान याच बँकांना वर्ग केला जातो. अंबाजोगाई जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे अंबाजोगाई युवा जिल्हा कृती समिती यांच्या निवेदनाची दखल घेऊन केज मतदारसंघाच्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई जिल्हा होण्यासाठीची मागणी विधिमंडळात केली आहे. असे असताना ही शेतकरी ज्या वेळेस बँकेत पैसे काढण्यासाठी जातो अथवा कोणत्या योजनेचा हप्ता न मिळाल्याबद्दल काही माहिती विचारतो. त्यावेळेस शेतकर्यांसोबत बँक कर्मचारी, बँकेने ठेवलेले गार्ड, शिपाई, मॅनेजर व व्यवस्थापक यांच्याकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक देण्यात येते. प्रसंगी अभद्र भाषेचा ही वापर केला जातो. मग्रुरीची भाषा करून त्यांना मनस्ताप दिला जाता. यात गर्दीच्या नांवाखाली काही तास, दिवसेंदिवस विनाकारण त्यांना बँकेत रांगेमध्ये उभे केले जाते. वयस्कर किंवा महिला शेतकर्याचा यांचा विचार केला जात नाही. मुस्लिम महिलांना तर अरेरावीची भाषा केली जाते. या उलट एखाद्या व्हीआयपी ग्राहकाचा फोन आला तर फोनवर त्याचे काम केले जाते. आणि शेतकरी हा रांगेतच ताटकळत उभा राहतो. राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राहक जास्त असतील तर बँक व्यवस्थापनाने त्यांचे कर्मचारी वाढवणे आवश्यक असते. तुटपुंजा कर्मचार्यावर बँक चालविली जाते. याचा परिणाम शेतकर्यांवर व सर्वसामान्य ग्राहकांवर होतो, उच्च शिक्षित असणारे बँकेचे अधिकारी कर्मचारी शेतकर्यांना कसा मानसन्मान द्यावा. याचेही भान यांना नसेल तर यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच बँक व्यवस्थापनाला सक्त ताकीद द्यावी की, शेतकरी वयस्कर महिला, पुरूष, मुस्लिम धर्मीय महिला, दिव्यांग व्यक्ती यांचा राष्ट्रीयकृत तसेच ग्रामिण बँकेने योग्य तो मानसन्मान ठेवावा व बँकेचा व्यवहार आदरपूर्वक करावा. अशी अपेक्षा या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रश्नी राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँका असाच मनमानी कारभार करणार असतील तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या
वतीने अशा बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा ही जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी दिला आहे. निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, एम.आय.एम पक्षाचे बीड जिल्हा प्रवक्ते रमीज सर, लोकजनक्ती पक्षाचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष राजेश व्हावळे, बाळा गायके, पत्रकार अभिजीत लोमटे, पत्रकार अतुल जाधव यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती.
======================
Comments
Post a Comment