शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने राबविले सामाजिक उपक्रम
समाज हिताचे उपक्रम राबवून
शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने बांधिलकी जोपासली - अक्षय मुंदडा
=========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
येथील शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गरजू लोकांना कपडे वाटप, अन्नदान आणि स्वाराती शासकीय वैद्यकीय रूग्णालयात फळ वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
अंबाजोगाई शहरातील शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गणेश आप्पा बरदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन करण्यात आले. यानिमित्त शुक्रवार, दिनांक 11 व 12 ऑगस्ट या दोन दिवशी हनुमान मळा, माळीनगर येथे अमोद कुलकर्णी यांनी पुढाकार घेत वृक्षारोपण केले. तर श्री कुलकर्णी यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेजारच्या शिकलकरी समाजाच्या वस्तीत गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच विकास वाबळे यांच्या पुढाकाराने स्वाराती शासकीय वैद्यकीय रूग्णालयात फळ वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील धानोरा (खु.) येथील सेवा मतीमंद विद्यार्थ्यांचे निवासी शेतकी पुनर्वसन शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात अन्नदान करण्यात आले. सोबतच योगेश्वरी देवी मंदीर येथे महाआरती व लोकनेते यशवंतराव चव्हाण चौक परिसरात ध्वजारोहण आणि भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्यात गणेश आप्पा बरदाळे मित्र मंडळाकडून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत 40 जणांनी रक्तदान केले. या प्रसंगी युवा नेते अक्षय मुंदडा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, जिल्हा उपाध्यक्ष तसेच सहकार सेना जिल्हाध्यक्ष सुनील जगताप, छावाचे जिल्हाध्यक्ष सरपंच विशाल श्रीरंग (पोहनेर), माजी नगरसेवक दिनेश भराडीया, शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश आप्पा बरदाळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना युवा नेते अक्षय मुंदडा म्हणाले की, आपण माणूस आहोत आणि समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव जीवन समृद्ध करायला मदत करते. या जाणीवेची ज्योत घेवून तन, मन, धनाचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे. देण्यातील आनंद हा वेगळाच असतो. दातृत्व असणाऱ्या व्यक्तींची संख्या समाजात कमी होत असताना शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेसारख्या सामाजिक संस्था समाजाच्या भल्यासाठी पुढ येत आहेत याबद्दल युवा नेते मुंदडा यांनी समाधान व्यक्त केले. तर अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा स्वीकार करून कृतज्ञता व्यक्त करताना गणेश बरदाळे हे म्हणाले की, मी माझं कुटुंब, मुलं-बाळं या पलीकडे जावून समाजाचा आपण विचार केला पाहिजे. ज्या समाजातून मी मोठा झालो. त्या समाजाचं मी देणे लागतो. त्या समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. समाजाचं भलं व्हावं, समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी अव्याहतपणे धडपडणारी माणसं आपण आजूबाजूला पाहतो. पण मला काय त्याच ? असं म्हणून आपण पुढं चालत राहतो. मग आजच्या पिढीने आदर्श शोधावयाचे कोठे ? तसे आदर्श आज समाजात आहेत. त्यांचा आपण शोध घेतला पाहिजे. ही मंडळी आपापल्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार विविध क्षेत्रामध्ये समाजसेवेचे कार्य करीत आहेत. त्या सर्व थोर व्यक्तींची असंख्य नांवे आपणांस घेता येतील. या लोकांनी जे काम चालवले आहे. ते समाजाच्या भल्याचे आहे. त्यांच्या कामातून कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, तर कुठे न्याय मिळवून दिला जात आहे. समाजातील हे लोक खरे खुरे आयडॉल्स आहेत. याचं कार्य दीपस्तंभासारख मार्गदर्शक आहे. या समाजधुरीणींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बरदाळे यांनी दिली. हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी विकास वाबळे, प्रा.नितिन शिंदे, मनोजकुमार बरदाळे, अरूण पांचाळ, दासोपंत पांचाळ, श्रीकांत भोसले, नामदेव पोद्दार, दत्ता सौंदळे, संगमेश्वर सौंदळे, राजकुमार चिले, बाबासाहेब वाघमारे, राहुल माने, सुरज किर्दंत, अशोक कोकाटे, श्रीराम बारगजे, श्री कुलकर्णी, गोविंद लोमटे, सागर पवार, तन्मय कुलकर्णी, राम किर्दंत, अनिकेत खोकले, अनुज बाभुळगावकर, अभिषेक नरवणे, कपिल कुलकर्णी, अमिश्वर यादव, जयकुमार सोमवंशी, रामराजे शितोळे, पप्पू काकडे, देवानंद पवार, संदिप किरडे पाटील, कैलास सोळूंके, गणेश जाधव, कैलास शिंदे, नितीन कोकाटे, शंकर जगताप, अशोक कोकाटे, सचिन जाधव, ज्ञानेश्वर भराडे, बबलू भोसले, सागर मिरजूडे, युवराज गायकवाड, कैलास शिंदे, ओमकार थोरात, राहुल शिंदे, मुंजा चाफेकर, अरूण सोळंके, राहूल जाधव, सुशिल ढवारे, अजय जाधव यांच्यासह मित्र परिवार आणि शिवप्रेमी युवा सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
=======================
Comments
Post a Comment