दीनदयाळ नागरी सहकारी बँकेकडून 5 टक्के लाभांश जाहीर
बॅंकींग सेवा योग्य व पारदर्शक ठेवून बॅंकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील - दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की
=========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे
(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
"विश्वास, विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीनुसार कार्यरत असलेली दीनदयाळ नागरी सहकारी बँक मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात मागील काही वर्षांत नांवारूपास आली आहे. आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारी बँक म्हणून ही आज दीनदयाळ बँकेकडे पाहिले जाते. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु मानून समाजाच्या सर्वच क्षेञात आर्थिकदृष्ट्या संपन्नता आणण्यासाठी दीनदयाळ बँक कटीबध्द आहे. बॅंकींग सेवा योग्य व पारदर्शक ठेवून बॅंकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. आर्थिक क्षेञात आश्वासक व दमदार पाऊले टाकणा-या दीनदयाळ बँकेला 31 मार्च 2023 अखेर 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा करपूर्व नफा झाला असून बँकेकडून 5 टक्के लाभांश जाहीर करीत असल्याची घोषणा दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
आर्थिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणार्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कै.गोपिनाथराव मुंडे सभागृह, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संचालक रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी, ऍड.शिवाजीराव कराड, दत्ताप्पा ईटके आणि मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषवावे याबाबत सुचक म्हणून सभासद प्रदीप कुलकर्णी यांनी बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांचे नांव सुचविले तर त्याला सभासद सुमनताई पटाईत यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांनी भारतमाता व पं.दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन केले. प्रार्थनेनंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. शैलेश पुराणिक यांनी पद्य सादर केले. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रारंभ झाला. सुरूवातीला संचालिका सौ.शरयूताई हेबाळकर यांनी अहवाल वर्षातील दिवंगतांसाठी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. यावेळी बँकेचे संगणक विभागप्रमुख मंगेश गोस्वामी यांनी "सायबर सेक्युरिटी" हा जनजागृतीपर प्रशिक्षण कार्यक्रम सभासदांसाठी सादर केला. "दीनदयाळ बँक" या विषयावर अभ्यास करून प्रबंध लिहिला व डॉक्टरेट पदवी संपादन करणारे डॉ.गोविंद जोशी यांचा व सलग 25 वर्षे अविरतपणे बँकेचे कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावल्याबद्दल सनतकुमार बनवसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तदनंतर आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या शाखांना मानांकन देत रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यात अहमदपूर शाखा (प्रथम), परळी रोड, अंबाजोगाई शाखा (द्वितीय), परभणी शाखा (तृतीय) यांचा समावेश आहे. याप्रसंगी संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विविध ठराव, प्रस्ताव मांडले त्याला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. सभागृहात उपस्थित सभासद हरिदास आपेट, सोमवंशी आणि व्यंकटेश पेन्सलवार यांच्यासह इतरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मुख्यकार्यकारी अधिकारी बनवसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उत्तरे दिली. त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी सांगितले की, दीनदयाळ नागरी सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसाला आपली बँक वाटते त्याचे कारण, या बँकेने ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतक यांचा विश्वास संपादन केल आहे. मागील 27 वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करताना बँकेने माणसे जोडण्याचे काम केले आहे. दीनदयाळ बँकेची 31 मार्च 2023 (आर्थिक वर्ष 2022 - 2023) अखेर आर्थिक वर्षासाठीचे लेखापरीक्षीत आर्थिक परिणाम सांख्यिकीय माहिती पुढीलप्रमाणे आहे (कंसातील सर्व नमुद आकडे हे कोटीत आहेत.) एकूण संकलित ठेवी (468.45), एकूण वितरीत कर्जे (292.11), एकूण गुंतवणुक (181.35), भागभांडवल (14.69), एकूण गंगाजळी (31.89), निव्वळ अनुत्पादक कर्जे (नेट एनपीए) चे प्रमाण 4.38 टक्के एवढे आहे., निव्वळ मालमत्ता (33.09), बँकेकडे (543.03) एवढे खेळते भांडवल आहे. बँकेने एकूण (760.56) एवढा व्यवसाय केला आहे. तर बँकेस तब्बल 4 कोटी 6 लाख इतका करपूर्व नफा झाला आहे. बँकेस संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र आहे. तसेच बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 17 एवढ्या शाखा कार्यरत असून अंबाजोगाई येथे बँकेचे मुख्य कार्यालय स्वत:च्या मालकीच्या भव्य इमारती मध्ये कार्यरत आहे. बँकेच्या वतीने प्रतिवर्षी युगपुरूष स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. मागील 21 वर्षांपासून राज्यातील व राज्याबाहेरील अनेक नामवंतांनी आपल्या अमोघ वाणीने अंबाजोगाईकरांना, ज्ञान, अध्यात्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक मेजवानी दिलेली आहे. वृक्षारोपण तसेच पाणी टंचाईच्या काळात बँकेचे आधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बंधारा बांधला. मुक्या जनावरांसाठी बँकेच्या वतीने पाणपोईची सुविधा करण्यात आलेली होती. मागील काही वर्षांत बँकेच्या मुख्यालयास सुप्रसिद्ध समाजसेवक, आर्थिक व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार, शिक्षण तज्ज्ञ, सिने व नाट्य कलावंत, लेखक, व्याख्याते, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती, आर.बी.आय.चे वरीष्ठ अधिकारी या मान्यवरांनी वेळोवेळी बँकेस भेटी देवून आपले अभिप्राय नोंदविले आहेत. कोविडच्या काळात सर्व ग्राहकांना दर्जेदार व तत्पर बँकिंग सेवा दिल्याबद्दल ग्राहकांच्या वतीने बँकेस वेळोवेळी लेखी प्रशंसा व गौरवपत्र प्राप्त झालेले आहेत. तसेच यावर्षी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तो म्हणजे बॅंकेच्या सर्वांगिण कार्याची दखल घेऊन सलग दुसऱ्या वर्षी 400 ते 500 कोटी रूपयांच्या ठेवी जमविलेल्या गटात दीनदयाळ बँकेस "बँको ब्ल्यू रिबन" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे. बँकेने नेहमीच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा विश्वास संपादन केला आहे. तत्पर व दर्जेदार बॅंकींग सेवा, सुविधा उपलब्ध करून देत दीनदयाळ बँकेने सहकार क्षेत्रात "बिना संस्कार, नही सहकार" हा संस्कार जोपासला आहे. एक परिवार म्हणून काम करताना "विश्वास, विकास आणि विनम्रता" हे ब्रीद घेऊन आश्वासक प्रगती साधली आहे. सध्या बँकेच्या मराठवाड्यात अंबाजोगाई, माजलगाव, परळी वैजेनाथ., पालम, परळी रोड, नांदेड, उदगीर, लातूर, देगलूर, परतूर, धारूर, नायगांव बाजार, परभणी, औरंगाबाद, अहमदपूर, जालना बीड या ठिकाणी शाखा असून सुरूवाती पासूनच सामाजिक बांधिलकी मानून ही बँक आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहे. संपूर्ण संगणकीकृत सेवा बँक पुरविते, रूपे ए.टी.एम.ची तथा युपीआयची सेवा ही उपलब्ध आहे. बँकेच्या ए.टी.एम.मशीन मध्ये इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे ए.टी.एम.कार्ड वापरता येतात. बँकेच्या सर्वांगीण विकासात बँकेच्या संचालिका तथा महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पालवे) यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तर उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संचालक रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ, इंजि.बिपीन क्षीरसागर, प्राचार्य किसन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, ऍड.शिवाजीराव कराड, दत्ताप्पा ईटके आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे तसेच आर.बी.आय.,सहकार खात्याचे आयुक्त, तथा निबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक तसेच बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, आय.टी.अधिकारी, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट यांचेसह सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, हितचिंतक आदींचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याची माहिती देवून अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी सभासदांच्या अपेक्षा, बँकींग सेवा योग्य व पारदर्शक रहाव्यात यासाठी बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचारी वर्ग हा प्रयत्न करीत आहेच आपल्या सुचनांमुळे अधिक गुणवत्तेत आणखीन भर पडेल असा विश्वास व्यक्त केला. दीनदयाळ बँकेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेचे सभासद, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार संचालक प्रा.अशोक लोमटे यांनी मानले. एकात्मता मंत्राचे पठण करून वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली.
========================
Comments
Post a Comment